Anjali damania target sanjay shirsat and siddhant shirsat over Domestic violence case
छत्रपती संभाजीनगर : राजकीय वर्तुळामधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तसेच खळबळजनक दावे केले जात आहे. राजकीय वर्तुळामध्ये सध्या संजय शिरसाट आणि त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट हे चर्चेत आले आहेत. मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी असे अनेक आरोप संबंधित महिलेने केले होते. मात्र अवघ्या काही तासांमध्ये सदर महिलेने आरोप मागे घेत हे प्रकरण वैयक्तिक असल्याचे सांगितले. यावरुन आता राजकारण तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी हाच का तुमचा न्याय असा सवाल केला आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
सिद्धार्थ शिरसाट यांच्यावर टीका करणाऱ्या महिलेने आरोप मागे घेऊन हे आमचे वैयक्तिक प्रकरण असल्याचे सांगितले. यावरुन आता अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या म्हणाल्या की, “सामाजिक न्याय मंत्री, जे त्यांचा घरात न्याय करत नाहीत, ते महाराष्ट्राच्या समाजासाठी काय खाक न्याय मिळवून देणार ?, हे माझं वैयक्तिक प्रकरण? असे ते म्हणूच कसे शकतात?…घरची प्रकरणे ही सगळ्यांच्याची वैयक्तिकच असतात. पण त्यात त्या मुलींचा छळ होणं आणि तिला न्याय मिळवून देणे हा सामाजिक मुद्दा नाही का?,” असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“आरोप केलेल्या महिलेने कायदेशीर नोटीस मागे घेतली आहे. यावरुन सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे देखील अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. पुढे त्या म्हणाल्या की, ब्लेड ने स्वतःला कापून, स्वतःवर बंदूक लावून मी आत्महत्या करेन, अशी धमकी देऊन, त्या मुलीला लग्न करायला भाग पाडलं, लग्नानंतर गर्भपात करायला लावणे, आणि नंतर माझे वडील मंत्री होणार आहेत, ते शिंदांचे उजवे हात आहेत, असे म्हणून तिला तिला धमकावून वाऱ्यावर सोडलं, अशा मुलाला शिक्षा न देता त्या मुलीवर दबाव आणणं हा ‘सामाजिक न्याय मंत्र्यांचा’ न्याय आहे का? ह्या सामाजिक मंत्री मंत्रीपदाला हे लायक नाहीत. एकनाथ शिंदेंनी ह्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावे,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सिद्धांत शिरसाट यांच्यावर आरोप करणाऱ्या यांच्या मुलावर केलेल्या आरोपांबाबत महिलेने मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली आहे, “मी आरोप मागे घेत आहे आणि माझ्यावर कोणताही दबाव नाही. संजय शिरसाट यांचा मी सन्मान करते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोप मागे घेत आहे. हा आमचा वैयक्तिक प्रश्न असून, या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये. या प्रकरणाला मी फुलस्टॉप देते. जर कोणी माझ्या नावाने राजकारण करेल तर मी कायदेशीर कारवाई करेन.” तिने अजून म्हटले की, “मी शिरसाट साहेबांचा सन्मान करते. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही आणि फोनही केला नाही.” या विधानानंतर प्रकरणाला शांतता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र राजकीय वर्तुळांतून या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.