Maharashtra Local Body Elections News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकांसाठी राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यातील प्रमुख महापालिकाच्यां निवडणुकांसाठी भारतीय जनात पक्षाने मोठी तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यावेळी भाजप या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचे कारण म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमिक शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे हे तीनही दिवस ते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. पण यातही त्यांनी या तीन महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शाहांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी चाचपणी करण्याच्या सुचना दिल्याचे सांगण्यात आले आहेत. दुसरीकडे मुंबई आणि ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी ताकद आहे. तर पुण्यात अजित पवार यांचीही ताकद आहे. त्यामुळे भाजप याठिकाणी स्वबळावर लढू शकते का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, काल (27 मे) एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेत १०७ जागा मागितल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये सद्या २२७ प्रभाग आहेत. त्यातील १०७ प्रभागात शिंदे गटाचे उमेदवार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. अमित शाहांनी एकनाथ शिंदेंची बाजू ऐकून घेतली असली तरी त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन मात्र दिले नसल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शहांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेतला आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्यासाठी त्यांनी पक्षातील नेत्यांना सुचनाही दिल्या आहेत. पण आता शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे भाजपची ताकद वढली आहे. २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरले होते. त्यावेळी भाजपला ९२, तर शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, सध्याच्या स्थितीत शिवसेना दोन गटांत विभागली गेल्याने भाजपची तुलनात्मक ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच भाजपकडून स्वबळावर लढण्याचा पर्याय गांभीर्याने तपासला जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
नागपूर हिंसाचारप्रकरणी मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; फहीम खानवर देशद्रोहाचा ठपका कायम
गेल्या तीन वर्षांत ठाकरे गटाला धक्का देत, मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश केला आहे. २०१२ आणि २०१७ मधील पालिका निवडणुकांत विजयी झालेले शंभरहून अधिक माजी नगरसेवक सध्या शिंदे गटात आहेत. पालिका निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळेल, या आश्वासनावर त्यांनी ठाकरे गट सोडला आहे. त्यामुळे या नगरसेवकांना नाराज करता येणार नाही आणि दिलेला शब्द पाळावाच लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल्याची माहिती आहे.