Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुपाली चाकणकरांच्या अशोक खरातसोबतच्या फोटोवरून अंजली दमानिया भडकल्या, SIT कडून चौकशीची मागणी

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी आता रुपाली चाकणकर यांना चांगल्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. SIT आणि ED चौकशींचा ससेमिरा मागे लागला असतानाच आता अशोक खरात समवेत असलेल्या फोटोजमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 15, 2026 | 06:45 PM
Anjali Damania slams Rupali Chakankar over viral photo with Ashok Kharat

Anjali Damania slams Rupali Chakankar over viral photo with Ashok Kharat

Follow Us
Close
Follow Us:
  • रुपाली चाकणकर अशोक खरात समवेत असलेल्या फोटोजमुळे अडचणीत
  • सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया SIT ला माहिती पाठवणार
  • आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून पोस्ट करत दिली माहिती
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी आता रुपाली चाकणकर यांना चांगल्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. SIT आणि ED चौकशींचा ससेमिरा मागे लागला असतानाच आता अशोक खरात समवेत असलेल्या फोटोजमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अश्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुवाहाटीमधील अशोक खरात, रुपाली चाकणकर आणि इतर कथित कुटुंबियांच्या असलेल्या फोटोजवरून चांगलीच आगपाखड केली आहे. याबाबत आपण SIT ला देखील माहिती पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून पोस्ट करत त्यांनी हि माहिती दिली.

“माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या,” ED चौकशीनंतर रुपाली चाकणकरांचे मोठे वक्तव्य

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून अशोक खरात समवेत रुपाली चाकणकर आणि कुटुंबीयांचा वादग्रस्त फोटो पोस्ट करत अंजली दमानिया म्हणाल्या, “काल ह्या फोटोवर, आणि गुवाहाटी वर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रश्न असा की हा फोटो माध्यमांकडे अचानक कुठून आला, का मुद्दाम दिला (पेरला) गेला, हे गूढ परमेश्वराला माहीत. त्यांचे म्हणणे आहे की त्या परिवारासकट गुवाहाटी ला गेल्या होत्या. पण ज्या माध्यमाने ती बातमी चालवली त्यांनी फक्त तीनच नावांची उल्लेख केला आहे. रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात.

१) २८ ऑगस्ट २०२१ ला खरोखर ३ माणस गेली होती की १२ माणसे गेली होती ह्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. एक महत्वाची बाब म्हणजे, ह्या तारखेनंतर दोन महिन्यात, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या.

२) बरं, त्या माध्यमाच्या बातमी मधे आणि एक तारीख होती, ती म्हणजे ३०/०६/२०२३. ३० जूनला रुपाली चाकणकर ह्या पुन्हा गुवाहाटी ला गेल्या होत्या. दोन दिवस राहिल्या, आणि २ जुलै ला परत आल्या. ह्याच तारखेला अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि २ जुलै ला त्यांचा उप मुख्यमंत्री म्हणून शपथ विधी झाला.

३) तिसरी गोष्ट, हा फोटो रॅडिसन ब्लूचा, गुवाहाटीचा नाही असे आत्तातरी वाटते.

मी ही माहिती SIT ला पाठवली आहे आणि त्यांना विनंती की त्यांनी ह्याचा तपास करावा.”

काल ह्या फोटोवर, आणि गुवाहाटी वर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रश्न असा की हा फोटो माध्यमांकडे अचानक कुठून आला, का मुद्दाम दिला (पेरला) गेला, हे गूढ परमेश्वराला माहीत. त्यांचे म्हणणे आहे की त्या परिवारासकट गुवाहाटी ला गेल्या होत्या. पण ज्या माध्यमाने ती बातमी चालवली… pic.twitter.com/AXxVq0P2jF — Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 15, 2026

ईडीकडून रुपाली चाकणकर यांची कसून चौकशी

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची १४ मे रोजी ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. अशोक खरात सोबत केलेल्या गुवाहाटी दौऱ्याबद्दल तसेच त्याचासोबत कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. अनेक बातम्यांचा विपर्यास केला गेला. खरातसोबत आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता. ईडीच्या चौकशीत मी सगळी उत्तर दिली आहेत,” असे त्या म्हणाल्या. ईडी चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “जेव्हा जेव्हा चौकशीला बोलावलं आहे तेव्हा हजर राहिलो आहे. माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. अनेक बातम्यांचा विपर्यास केला गेला. खरातसोबत आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता. ईडीच्या चौकशीत मी सगळी उत्तर दिली आहेत. नोटीस मिळण्याआधी तीन दिवसांपूर्वी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. तपासात आम्ही योग्य ते सहकार्य वेळोवेळी केलं आहे. चार साडेचार तास चौकशी झाली. यामध्ये जबाब नोंदवणं, लिहून घेणं, मधला लाँच ब्रेक अश्या बराचसा वेळ होता. मी पहिल्या दिवशी जे सांगितलं ते आजही सांगते खरातशी आमचा कोणताही आर्थिक संबंध नव्हता. कोणत्याही जमिनीत आम्ही पार्टनर नव्हतो. त्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाहीत,” असे त्या म्हणाल्या.

Breaking News: Devendra Fadnavis यांची साताऱ्यात मोठी घोषणा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Web Title: Anjali damaniya slams rupali chakankar over viral photos with ashok kharat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • anjali damania
  • Ashok Kharat
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

“माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या,” ED चौकशीनंतर रुपाली चाकणकरांचे मोठे वक्तव्य
1

“माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या,” ED चौकशीनंतर रुपाली चाकणकरांचे मोठे वक्तव्य

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स
2

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स

Rupali Chakankar SIT Inquiry : रुपाली चाकणकरांची ६ तास ‘एसआयटी’ चौकशी; अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत वाढ
3

Rupali Chakankar SIT Inquiry : रुपाली चाकणकरांची ६ तास ‘एसआयटी’ चौकशी; अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत वाढ

“The Maharashtra Files” चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न! सिनेतारकांनी वाढवली कार्यक्रमाची शोभा
4

“The Maharashtra Files” चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न! सिनेतारकांनी वाढवली कार्यक्रमाची शोभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.