Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

Pune News: आम्ही मुस्लिम आणि दलितांच्या शिक्षण व रोजगारावर भर देऊन त्यांचे सामाजिक उत्थान साधण्याचे काम करणार असल्याचे ओवैसी म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2025 | 07:40 PM
Asaduddin Owaisi On Modi: "दिल्लीत बसलेला जादुगार..."; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

Asaduddin Owaisi On Modi: "दिल्लीत बसलेला जादुगार..."; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

Follow Us
Close
Follow Us:

भाजपचे खासदार केवळ मोदींच्या नावावर जिंकतात
बलात्कार करणाऱ्यांना मोकळे सोडले जाते – ओवैसी
राष्ट्रीय सुरक्षेबाबत ठोस धोरण नाही- ओवैसी

पुणे: भाजपचे जे काही खासदार निवडून येतात ते केवळ मोदींच्या नावावर येतात. दिल्लीत बसलेला एक जादुगार लोकशाहीला कमकुवत करत आहे. त्यांच्या धोरणांमुळे दोन पिढ्या बरबाद झाल्या असून, २५ टक्के तरुणांना योग्य शिक्षण आणि रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे, अशी खरमरीत टीका एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असुद्दीन ओवेसी यांनी केली.  पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे बुधवारी ओवैसी यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

ओवैसी म्हणाले की, सामान्य नागरिकांना न्यायालयात पाच-पाच वर्ष जामीन मिळत नाही, पण बलात्कार करणाऱ्यांना मोकळे सोडले जाते. दुसरीकडे, गोरक्षणाच्या नावावर मुस्लिम समाजाला लक्ष्य केलं जात आहे. मुस्लिम सर्व क्षेत्रांत मागे आहेत. भाजपकडे राष्ट्रीय सुरक्षितता व लोकशाहीतील बदल याबाबत ठोस पर्याय नाही. पाकिस्तानची लष्करधार्जिणी व्यवस्था भारतासाठी सतत धोका निर्माण करणारी आहे. भारताचे शेजारी नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशात सरकार विरोधी आंदोलने झाली तेथील सत्ता उलथवण्यात आली. मात्र याची कल्पना देखील सरकारला नव्हती. हे सर्व देश चीनकडे झुकत आहेत, तरी केंद्र सरकार योग्य धोरण आखत नाही. राष्ट्रीय सुरक्षेबाबत ठोस धोरण नाही. त्यामुळे विरोधी पक्ष बलाढ्य असणे आवश्यक आहे. लोकांना खरा पर्याय हवा आहे, असे ते म्हणाले.

मुस्लिम संख्या कधीच हिंदूंपेक्षा जास्त नसेल

ओवेसी म्हणाले की, मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा कधीच जास्त होणार नाही. एका अहवालानुसार मुस्लिमांची लोकसंख्या ही स्थिर झाली आहे, तर हिंदूंची लोकसंख्या ही २०७१ पर्यंत  स्थिर होईल. मुस्लिमांचा जन्मदर कमी झाला आहे.

बिहारमध्ये NDA जिंकल्यास भाजप नितीश कुमारांचा गेम करणार? असदुद्दीन ओवैसींच्या दाव्याने खळबळ

मिलेनियम आणि जेन झी जाब विचारेल

भारतातील एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के जनता ४५ वर्षांखालील आहे. मिलेनियम आणि झेन झी पिढीला रोजगार नाही. त्यांना भाजप जाणीवपूर्वक दुसऱ्या मुद्द्यांमध्ये गुंतवत आहे. जेव्हा या दोन्ही पिढ्या सरकारला प्रश्न विचारू लागतील तेव्हा सरकार अडचणीत येईल.

महाराष्ट्राला पंतप्रधान मदत का देत नाहीत 

महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांवर प्रचंड मोठे संकट ओढवले आहे. या परिस्थिती पंतप्रधान राज्यातील पूरग्रस्तांसाठी निधी का देत नाही? असा सवाल ओवैसी यांनी केला. मोदी किंवा गृह मंत्री अमित शहा पूरस्थितीची पाहणी का करत नाहीत. केंद्रात आणि राज्यात ‘डबल इंजिन’सरकार आहे, तर त्याची ताकद दाखवून द्या, असे आवाहनही ओवैसी यांनी केले. या वेळी प्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील व सरचिटणीस मंगेश फल्ले यावेळी उपस्थित होते.

केवळ शिरखुरमा पिण्याने एकोपा होत नाही

दर्ग्यावर चादर चढवणे किंवा शिरखुरमा पिण्याने एकोपा निर्माण होत नाही. मुस्लिमांना भारतीय म्हणून वागणूक दिल्याशिवाय भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरु होऊ शकणार नाही. आम्ही मुस्लिम आणि दलितांच्या शिक्षण व रोजगारावर भर देऊन त्यांचे सामाजिक उत्थान साधण्याचे काम करणार असल्याचे ओवैसी म्हणाले.

Asaduddin Owaisi: पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाका…; असदुद्दीन ओवेसींची मागणी

पाक व्याप्त काश्मिर आपलाच

पुलवामाचा हल्ला, पहलगामचा हल्ला यावर भाष्य करतानाच, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, संसदेनेही तसा ठराव केला आहे. जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका, असे ओवैसी म्हणाले.

Web Title: Asaduddin owaisi critixizes to pm narendra modi government in pune marathi news political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 07:40 PM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • PM Narendra Modi
  • Pune

संबंधित बातम्या

Mhada Lottery : स्वस्तात घर खरेदी करण्याची शेवटची संधी, ४१८६ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, शेवटची तारीख कधी?
1

Mhada Lottery : स्वस्तात घर खरेदी करण्याची शेवटची संधी, ४१८६ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, शेवटची तारीख कधी?

देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात  हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल
2

देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल

Nitish Kumar: बिहारमध्ये पुन्हा एकदा ‘नितीश नीती’ यशस्वी! वाचा NDA च्या विजयाची कहाणी
3

Nitish Kumar: बिहारमध्ये पुन्हा एकदा ‘नितीश नीती’ यशस्वी! वाचा NDA च्या विजयाची कहाणी

Pune Crime: पुण्यात हत्येचं सत्र सुरु! चुलत भावाकडून तरुणाची हत्या, मृतदेह पोत्यात भरला आणि…
4

Pune Crime: पुण्यात हत्येचं सत्र सुरु! चुलत भावाकडून तरुणाची हत्या, मृतदेह पोत्यात भरला आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.