Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…तर आमचा समाज पेटून उठेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा, ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार?

राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मसुदा तयार केल्याचे समजत आहे. अश्यातच आता ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

  • By विवेक
Updated On: May 30, 2026 | 04:10 PM
Babanrav Taywade slams Maharashtra Government over Manoj Jarange Patil's deemand of Maratha Reservation, Babanrav Taywade slams Maharashtra Government, Manoj Jarange Patil's deemand of Maratha Reservation,, Manoj Jarange Patil,

Babanrav Taywade slams Maharashtra Government over Manoj Jarange Patil's deemand of Maratha Reservation, Babanrav Taywade slams Maharashtra Government, Manoj Jarange Patil's deemand of Maratha Reservation,, Manoj Jarange Patil,

Follow Us
Follow Us:

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले असून आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. अंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसले असून सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. राज्य सरकारनेही याबाबत ऍक्शन घ्यायला सुरुवात केली असून जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मसुदा तयार केल्याचे समजत आहे. अश्यातच आता ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले बबनराव तायवाडे?

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर बोलताना डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, “जरांगे पाटील यांचं आजपासून उपोषण सुरु झालं आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे. आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही रस्त्यावर उतरू. जरांगे पाटील यांना वेगळं आरक्षण द्या. आमच्या ताटातलं काहीही देऊ नका. ओबीसी प्रमाणपत्र देऊन बोगस ओबीसी आमच्यात आले तर आमचा समाज पेटून उठेल,” असे विधान त्यांनी केलं आहे.

ते पुढे म्हणाले, “सरकारने ओबीसी मंत्रालयाला मराठा नाव जोडल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. अनेक वर्षाचे प्रयत्न आणि आंदोलनानंतर आम्हाला ओबीसी मंत्रालय मिळालं आहे. राज्य सरकार जरांगे पाटील यांना जो ड्राफ्ट देणार त्यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. सरकारच्या ड्राफ्टमध्ये आमच्या अधिकारांवर गदा येत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही.मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वस्त केलं आहे कि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य करत त्यांनी जरंगे पाटलांना प्रकृतीची काळजी घेण्याचे तसेच सावलीत जाऊन आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

‘शरद पवार आणि मामांना भेटायची हिंमत नाही’; प्राजक्त तनपुरेंची भावूक प्रतिक्रिया, अखेर भाजपमध्ये प्रवेश निश्चित!

जरांगे पाटलांच्या मागण्या काय?

मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी सरकारसमोर काही ठोस मागण्या मांडल्या आणि केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष आदेश काढण्याची मागणी केली.

१. ५८ लाख मराठा-कुणबी नोंदीं

जरांगे म्हणाले की, सरकारने शोधलेल्या ५८ लाख मराठा-कुणबी नोंदींच्या आधारे संबंधित नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र (Validity) देण्यात यावे. यासाठी शासनाने स्पष्ट आदेश काढावेत. प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई किंवा निलंबनाची तरतूद असावी, अशी मागणी त्यांनी केली.

२. हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्र

हैदराबाद गॅझेट आणि स्थानिक चौकशी अहवालाच्या आधारे अर्ज करणाऱ्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र आणि वैधता देण्यात यावी. केवळ मसुदा (Draft) नव्हे तर प्रत्यक्ष शासन आदेश जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी सांगितले.

३. सातारा संस्थान संदर्भातील जीआर

सातारा संस्थानाशी संबंधित शासन निर्णय (GR) काढण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र मराठा आरक्षणासंदर्भातील कोणताही निर्णय न्यायालयात आव्हान दिला जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

‘वृद्ध झालेल्या मंत्र्यांना घरी पाठवा, अन्…’; आमदार संतोष बांगर यांची मागणी

Web Title: Babanrav taywade slams maharashtra government over manoj jarange patils deemand of maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Dr. Babanrao Taiwade
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Arakshan

संबंधित बातम्या

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात
1

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली
2

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात
3

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम
4

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.