Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : उत्तर सोलापूरमध्ये अजित पवारांनी दाखवली ताकद; साठे पिता-पुत्रांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश

वडाळा येथील विठ्ठल मंगल कार्यालयात बळीराम साठे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साठे पिता पुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 27, 2025 | 04:21 PM
Baliram Sathe joins NCP Ajit Pawar faction in North Solapur political news

Baliram Sathe joins NCP Ajit Pawar faction in North Solapur political news

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Politics : उत्तर सोलापूर : अवघ्या एकाच दिवसात नियोजन करुन तीन हजार लोकांचा जनसमुहाय जमवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, जयदीप साठे या साठे पिता-पुत्र नातवासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साठे पिता पुत्रांनी घड्याळाचे उपरणे परिधान करुन गुरुवारी (दि.27 ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

दरम्यान नगरपरिषदांच्या निवडणूक काळात प्रचार सभांशिवाय अन्य कार्यक्रम घ्यायचा नाही, असे ठरविले.मात्र, काका साठे यांच्यासारखी माणसं मिळण, हे भाग्यच असल्याचे सांगून खास त्यांच्या प्रवेशासाठी वडाळा गावात आलो असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार यांनी काका साठे यांच्या साठ वर्षांच्या निष्ठेच्या आणि विकासाच्या राजकारणाचे कौतुक करुन त्यांच्या कौतुकाचा पाढाच वाचला. उत्तर सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी मी भक्कमपणे पाठिशी असल्याची ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली. वडाळा येथील विठ्ठल मंगल कार्यालयात बळीराम साठे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा खास कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी अजित पवार म्हणाले, सत्ता ही उपभोगण्यासाठी नाही तर जनता जनार्धनाच्या सेवेसाठी आहे. साठे यांनी सत्तेची भाकरी कधीच करपू दिली नाही. साठ वर्षे त्यांनी पवार साहेबांवर त्यांनी निष्ठा जपली. महिला आरक्षण असो व विकास आम्ही पवार साहेबांची परंपरा पुढे चालू ठेवली आहे. मी कामाचा माणूस आहे. हेलपाटेवारी मला चालत नाही. सोलापूर जिल्हा बँकेची स्थिती कोणामुळे झाली. पुणे जिल्हा बँकेत 35 वर्षांपासून आमची सत्ता असून राज्यात पहिला, दुस-या क्रमांकावर आम्ही असतो.

अंजली दमानिया आणि अजित पवारांमध्ये पेटलं वाकयुद्ध? पुणे जमीन घोटाळा थेट जाणार हायकोर्टात

आमदार खरे म्हणाले की, चार हजार कोटी रुपये विकास कामासाठी देऊनही त्यांची भूक भागली नाही. आता आठ हजार कोटी रुपयांच्या लालसेने त्यांनी तुमची साथ सोडली आहे. मी तुमच्या सोबत आहे. आगे आगे देखो क्या होता है! मतदारसंघाच्या विकासासाठी निधी द्या,असे ते म्हणाले. त्याचबरोब काका साठे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विभाजनाच्या मला अजित पवारांनी बोलाविले होते. पण मला शरद पवारांना सोडायचे नव्हते. त्यांच्या परस्पर पक्षात काहीही चालले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मला अजित पवारांसोबत जावे लागले मात्र, अजित पवार शेवटपर्यंत तुमच्या पक्षात एकनिष्ठ राहून जिल्हाभर पक्षाचे काम वाढवितो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, गेली साठ वर्षांपासून पवार साहेबांवर निष्ठा ठेवून विकासासाठी राजकारण केलेल्या काका साठे यांनी पवार कुटुंबाच्या विचाराशी फारकत घ्यायची नाही, या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बंद दाराआड सापडल्या पैशांनी खचाखच भरलेल्या बॅगा; निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी टाकली धाड

कायदा हातात घेऊन कुणाचंही भल होत नाही. कधी ना कधी फुगा फुटतो. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात, असे सांगून अप्रत्यक्षरित्या राजन पाटील यांना अजित पवारांनी टोला मारला. माझ्या शरिराच्या वजनावरुन लोक नावे ठेवू लागले म्हणून सर्जरी करुन वजन कमी केले. आता विकासासाठी निधी आणत नाही म्हणून नावे ठेवत आहेत, असे म्हणताच अजित पवार म्हणाले, शरिराचे वजन कमी करायचे तुम्ही बघा, जनमाणसातील वजन वाढवायचे मी बघतो.

थोडी कळ काढा

काका साठे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घ्या, अशी मागणी रानमसले ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ हावळे यांनी केली. तेव्हा अजित पवार म्हणाले, काका आता तरी पक्षात आलेत बघू ना….पण तुम्ही थोडी कळ काढा
संतांच्या विचारांचा वारसा काकांनी जपला आता जयदीप काकांचा वारसा तुला जपायचा आहे, असा कानमंत्रही अजित पवारांनी जयदीप साठे यांना उघडपणे दिला.

Web Title: Baliram sathe joins ncp ajit pawar faction in north solapur political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Local Body Election
  • Solapur News

संबंधित बातम्या

अजित पवारांच्या तिजोरीच्या किल्लीचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, हा दृष्टीकोन..”
1

अजित पवारांच्या तिजोरीच्या किल्लीचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, हा दृष्टीकोन..”

Maharashtra Politics : अंजली दमानिया आणि अजित पवारांमध्ये पेटलं वाकयुद्ध? पुणे जमीन घोटाळा थेट जाणार हायकोर्टात
2

Maharashtra Politics : अंजली दमानिया आणि अजित पवारांमध्ये पेटलं वाकयुद्ध? पुणे जमीन घोटाळा थेट जाणार हायकोर्टात

Solapur News: शरद पवारांना रामराम; बळीरामकाका साठे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
3

Solapur News: शरद पवारांना रामराम; बळीरामकाका साठे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

“मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा
4

“मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.