भाजप विजय किंजवडेकर यांच्या घरावर निलेश राणेंचे स्टिंग ऑपरेशन करुन २५ लाखांची रोकड जप्त केली (फोटो - सोशल मीडिया)
येत्या 2 डिसेंबर रोजी नगर परिषदा आणि नगर पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी मालवणमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी अचानक धाड टाकली. त्यांनी दारं बंद करुन घेत या भाजप कार्यकर्त्याला कोंडीत पकडले. या भाजप कार्यकर्त्याच्या घरी चक्क पैशांचं गबाड सापडलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर येत आहेत.
अजित पवारांच्या तिजोरीच्या किल्लीचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, हा दृष्टीकोन..”
शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काल थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले. यावेळी निलेश राणेंना विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली आहे. आमदार निलेश राणे यांनी किंजवडेकर यांच्या घराची सर्व दारे लावून घेतली. आणि स्टिंग ऑपरेशन करत पैसे बाहेर काढले. यामुळे मालवणच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अंजली दमानिया आणि अजित पवारांमध्ये पेटलं वाकयुद्ध? पुणे जमीन घोटाळा थेट जाणार हायकोर्टात
विजय किंजवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले. एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत हे पैसे असल्याचे दिसून आले. या पैशांचा निवडणुकीत गैरवापर होणार होता, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे, असं निलेश राणे म्हणाले. सदर घटनेनंतर निलेश राणेंनी निवडणूक विभागाच्या पथकाला आणि मालवण पोलिसांना पाचारण करुन कारवाई करण्याच्या सूचना केल्या. निवडणूक काळात मतदारांना प्रलोभने देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा पैशांवर कारवाई होणे ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
काय म्हणाले आमदार निलेश राणे?
आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राणे म्हणाले की, रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले, कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे. निवडणूक पैसा फेकून जिंकायची नसते, कामाने आणि विश्वासाने जिंकायची असते, भारतीय जनता पार्टीचे मालवण येथे रणजीत देसाई मोहन सावंत असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर मुंबईमधून कित्येक लोक पैसे वाटण्यासाठी खास येथे आलेले आहेत, यावर निवडणूक आयोग काय शासन करणार त्याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, असे स्पष्ट मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.






