
BJP Politics: भाजपने खेळला मोठा डाव! 'या' नेत्यावर सोपवली अध्यक्षपदाची जबाबदारी
भाजपने बिहार राज्यात केले मोठे बदल
बिहारला मिळाला भाजपचा नवीन अध्यक्ष
संजय सरावगी यांच्यावर सोपवली जबाबदारी
भाजपने नुकतेच बिहारमध्ये मोठे यश प्राप्त केले आहे. बिहारमध्ये एनडीएने सत्ता प्राप्त केली आहे. दरम्यान भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आणि कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने बिहारमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. दरम्यान बिहारमध्ये भाजपने संघटनेत बदल केले आहे. भाजपने बिहारचे अध्यक्षपद आता संजय सरावगी यांच्याकडे सोपवले आहे.
बिहार भाजपच्या अध्यक्षपदी संजय सरावगी यांची निवड करण्यात आली आहे. संजय सरावगी यांची बिहारच्या भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपने ही नियुक्ती तत्काल लागू केली आहे. संजय सरावगी ही सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरभंगा येथून ते निवडून आले आहेत.
विधायक संजय सरावगी को भारतीय जनता पार्टी बिहार का प्रदेश अध्यक्ष नियुक्त किया गया है। pic.twitter.com/oaUX95Td8k — ANI_HindiNews (@AHindinews) December 15, 2025
भाजप नेतृत्वाने संजय सरावगी यांच्यावर बिहार भाजपची जबाबदारी सोपवली आहे. संजय सरावगी आता दिलीप जयस्वाल यांच्या ऐवजी बिहार भाजपचे नेतृत्व करणार आहेत. ते दरभांगा येथून 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संजय सरावगी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य म्हणून 10 वर्ष काम केलेले आहे. भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने संजय सरावगी यांच्यावर बिहार भाजपची जबाबदारी सोपवली आहे.
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची नियुक्ती
बिहारच्या राजकारणातून आता राष्ट्रीय स्तरावर भाजप नेते नितिन नबीन (Nitin Nabin) यांची राजकीय ताकद अधिक मजबूत झाली आहे. भाजपने त्यांना मोठी जबाबदारी सोपवत पक्षाचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. हा निर्णय केवळ बिहारमध्येच नव्हे, तर पक्ष संघटनेत त्यांची वाढती पकड स्पष्टपणे दर्शवतो. बांकीपूरमधून ५ वेळा आमदार राहिलेल्या नितिन नबीन यांचा हा प्रवास अनुभव, संघटनात्मक क्षमता आणि पक्षाचा त्यांच्यावरील विश्वास दर्शवतो. या बातमीत जाणून घ्या, भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनलेले नितिन नबीन नेमके कोण आहेत.
नितिन नबीन कोण आहेत?
नितिन नबीन हे बिहारमधील अनुभवी भाजप नेते आहेत. ते बऱ्याच काळापासून पटनाच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांचा संघटन आणि विधानसभा अशा दोन्ही स्तरांवर मजबूत पकड आहे. त्यांनी बिहार सरकारमध्ये शहरी विकास, रस्ते, इमारत बांधकाम यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. प्रशासकीय कामात त्यांची तत्परता आणि सक्ती त्यांची ओळख आहे. ते जमिनीवरचे नेते मानले जातात, जे त्यांच्या मतदारसंघात खूप सक्रिय असतात. त्यांच्यात प्रशासकीय अनुभव आणि संघटनात्मक क्षमता यांचा समन्वय दिसून येतो.