
BJP Amit Shah Mumbai Visit uddhav thackeray nirdhar meleva raj thackeray meeting maharashtra politics
Amit Shah Mumbai Visit: मुंबई: राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. मुंबई पालिकेसह सर्वच पालिका आणि नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांचा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाची निर्धार सभा देखील पार पडणार आहे. याचबरोबर मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आज देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या नवीन कार्यालयाची पायाभरणी केली जाणार आहे. अमित शाह दुपारी १:१५ वाजता ऐतिहासिक चर्च गेटजवळील ब्लॉक क्रमांक ९ येथे पोहोचतील. ते वासानी चेंबर्स येथे नवीन महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष कार्यालयाचे भूमिपूजन करतील. त्याचबरोबर अमित शाह माझगाव डॉक येथे खोल समुद्रातील मासेमारी जहाज अर्थात डीप-सी फिशिंग वेसल्स यांचे उद्घाटन करणार आहे. भूमिपूजन आणि लोकार्पण असा अमित शाह यांचा मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम असला तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्वी असणारा त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर आज, मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट देखील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये एन. एस. सी. आय. डोम, वरळी येथे ठाकरे गटाचा निर्धार मेळावा होणार आहे. सायंकाळी असणाऱ्या या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे हे पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे ठाकरे गटातील नेत्यांना संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी आमदार, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख उपस्थित राहणार आहेत.यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये एकच उत्साह निर्माण झाला आहे.
राज ठाकरेंही साधणार पदाधिकाऱ्यांसोबत संवाद
त्याचबरोबर मनसे पक्ष देखील मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने आक्रमक झाला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील आज (दि.27) पक्षाची सभा बोलावली आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मनसेची सभा पार पडणार आहे. यामध्ये मनसे पक्षाची निवडणुकीची भूमिका, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील त्रुटी आणि यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेतील समस्यांवर चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे मुंबईमध्ये मराठी मतांसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता आहे. राज-उद्धव यांच्यामधील दुरावा कमी झाला असून दोन्ही नेत्यांमध्ये पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या आज पदाधिकारी आणि नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकांना विशेष महत्त्व निर्माण झाले आहे.