Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

योगी आदित्यनाथ की अमित शहा? मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल? RSS प्रमुख मोहन भागवत यांनी दिले स्पष्ट उत्तर

Mohan Bhagwat News: पंतप्रधान मोदींच्या जागी कोण येणार याची चर्चा राजकीय वर्तुळात बऱ्याच काळापासून सुरू आहे. या चर्चेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नावे पुढे आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 10, 2025 | 10:00 PM
योगी आदित्यनाथ की अमित शहा? मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल? (Photo Credit - X)

योगी आदित्यनाथ की अमित शहा? मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल? (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • ‘मोदींनंतर कोण कोण असेल उत्तराधिकारी?’
  • RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान
  • तमिळनाडूत RSS च्या मर्यादित उपस्थितीवर भाष्य
Who will be Modi’s Successor Marathi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यानंतर देशाचे नेतृत्व कोण करणार, याबद्दल देशातील राजकीय वर्तुळात गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राजनाथ सिंह (Rajanath Singh) यांची नावेही चर्चेत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhgwat) यांनी सोमवारी तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथे आरएसएसच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात भागवत यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले.

‘मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल?’ Who will be Modi’s Successor?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागा कोण घेईल, असे विचारले असता, भागवत यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाचा अंतिम निर्णय भारतीय जनता पक्ष (BJP) आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील परस्पर चर्चेनंतर घेतला जाईल. भागवत म्हणाले की, ही संपूर्ण प्रक्रिया पक्षाच्या धोरण आणि शिस्तीनुसारच असेल. त्यांनी योगी आदित्यनाथ किंवा अमित शाह यांच्यापैकी कोणाचेही थेट नाव घेतले नाही.

हे देखील वाचा: Mohan Bhagwat News: हिंदू असण्याचा अर्थ भारतासाठी जबाबदार असणे..; मोहन भागवतांचे सूचक विधान

तमिळनाडूत RSS च्या मर्यादित उपस्थितीवर भाष्य

भागवत यांनी तमिळनाडूमध्ये आरएसएसच्या मर्यादित उपस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “राज्यात राष्ट्रवादी भावना १००% अस्तित्वात आहे, परंतु काही कृत्रिम अडथळे ही भावना पूर्णपणे प्रकट होण्यापासून रोखत आहेत.” भागवत यांनी आश्वासन दिले की, हे अडथळे फार काळ टिकणार नाहीत आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तमिळनाडूचे लोक त्यांच्या संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित आहेत आणि ही मूल्ये आणखी मजबूत करणे महत्त्वाचे आहे.

लोकांना परंपरा जपण्याचे आवाहन

आरएसएस प्रमुखांनी तमिळनाडूतील जनतेला त्यांची मातृभाषा बोलण्याचे आणि पारंपरिक जीवनशैली टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. लोक तमिळमध्ये स्वाक्षरी करण्यास का कचरतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भागवत यांनी सर्व भारतीय भाषांना समान महत्त्व दिले, कारण त्या आपल्या सांस्कृतिक ओळखीचा आणि अभिमानाचा भाग आहेत. त्यांनी दक्षिण भारतीय राज्यांच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या पारंपरिक पोशाख “वेष्टी” चे कौतुक केले. भारतीय संस्कृतीची ही विविधता जपणे आणि प्रोत्साहन देणे समाज आणि देश दोघांसाठीही महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा: RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

Web Title: Yogi or shah who will be modis successor rss chief mohan bhagwat gave a clear answer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 09:04 PM

Topics:  

  • Amit Shah
  • mohan bhagwat
  • Nitin Gadkari
  • PM Narendra Modi
  • Yogi Aditynath

संबंधित बातम्या

ग्रीन एक्सप्रेसवेमुळे दिल्ली ते चेन्नई केवळ १२ तासांवर, नितीन गडकरी यांनी दिले मोठी अपडेट
1

ग्रीन एक्सप्रेसवेमुळे दिल्ली ते चेन्नई केवळ १२ तासांवर, नितीन गडकरी यांनी दिले मोठी अपडेट

Republic Day 2026: प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर अमेरिकन ‘अपाचे’चा थरार; ट्रम्प म्हणाले, ‘आमचे भारताशी ऐतिहासिक बंध’
2

Republic Day 2026: प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर अमेरिकन ‘अपाचे’चा थरार; ट्रम्प म्हणाले, ‘आमचे भारताशी ऐतिहासिक बंध’

Republic Day 2026: ड्रॅगन आणि हत्तीची जोडी पुन्हा एकत्र; शी जिनपिंग यांचा पंतप्रधान मोदींना संदेश, म्हटले, ‘दोन्ही देश…’
3

Republic Day 2026: ड्रॅगन आणि हत्तीची जोडी पुन्हा एकत्र; शी जिनपिंग यांचा पंतप्रधान मोदींना संदेश, म्हटले, ‘दोन्ही देश…’

PM Modi Republic Day greetings : भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक…! PM मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
4

PM Modi Republic Day greetings : भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक…! PM मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.