
BJP New National Team
नव्या टीममध्ये काही ‘जुन्या पण वजनदार’ चेहन्यांचे पुनरागमन हे विशेष लक्षवेधी ठरले आहे. संघाचे प्रचारक आणि भाजपच्या संघटनात्मक राजकारणातील महत्वाचे नाव राहिलेले राम माधव यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राष्ट्रीय महासचिवपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनाही राष्ट्रीय महामंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्याकडे केवळ व्यक्तीची पुनरागमन म्हणून पाहता येणार नाही. भाजपला राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक अनुभव, राजकीय आक्रमकता आणि विविध राज्यांतील राजकीय समीकरणांचा मेळ साधायचा असल्याचे यातून स्पष्ट होते.
Donald Trump: ‘तू फेक रिपोर्टर आहेस…’, पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले,
राष्ट्रीय महासचिवांच्या पातळीवर झालेला फेरबदल हा नव्या टीममधील सर्वांत महत्वाचा बदल आहे. विनोद तावडे आणि सुनील बन्सल याना कायम ठेवण्यात आले असले तरी अरुण सिंह, दुष्यंत गौतम, तरुण चुध आणि राधामोहन दास अग्रवाल यांना महासचिवपदावरून हटवण्यात आले. नव्या टीममधील सर्वांत ठळक बाब म्हणजे संघटनेतील दीर्घकाळ महत्त्वाच्या पदांवर असलेल्या काही नेत्यांची झालेली हकालपट्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, महासचिव आणि सचिव या प्रमुख पदावर मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर वसुंधरा राजे, बैजयंत पांडा, तारिक मन्सूर आणि रेखा वर्मा यांना कायम ठेवण्यात आले. मात्र सरोज पांडेय, डी. के. अरुणा, एम. चुबा आओ, ए. पी. अब्दुल्लाकुट्टी, लक्ष्मीकांत वाजपेयी आणि लता उसेंडी यांना या पदावरून हटवण्यात आले. यातून पक्षाने एका बाजूला सातत्य राखले असले तरी दुसऱ्या बाजूला संघटनेत नव्या नेतृत्वासाठी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
पावसाळ्यात कान आणि सायनसच्या संसर्गाचा का वाढतो धोका? संसर्ग टाळण्यासाठी अशी पद्धतीने घ्या काळजी
नव्या टीममध्ये सामाजिक आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वावर विशेष भर दिल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. पक्षाच्या माहितीनुसार, राष्ट्रीय टीममधील ४० टक्क्यांहून अधिक सदस्य वंचित समाजघटकांतून येतात. उत्तर प्रदेश, ईशान्य भारत आणि दक्षिण भारताला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्नही दिसतो. आंघ प्रदेशच्या डी. पुरंदेश्वरी यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद, तर तामिळनाडूव्या एम. वेंकटेशन यांना राष्ट्रीय सचिवपद देण्यात आले आहे. याचा सरळ राजकीय अर्थ म्हणजे भाजपला केवळ हिंदी पहुंचातील पक्ष अशी प्रतिमा मर्यादित ठेवायची नसून दक्षिण आणि ईशान्य भारतातही संघटनात्मक विस्तार मजबूत करायचा आहे.