Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: अभिजीत दीपके म्हणाले की, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतून या आंदोलनाला सुरुवात होईल. मुंबईतील भव्य आंदोलनानंतर, ही मोहीम देशभरातील इतर प्रमुख राज्ये आणि शहरांमध्ये विस्तारली जाईल.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 25, 2026 | 02:25 PM
Dnyanesh Kumar Resignation, Abhijeet Dipke CJP, Cockroach Janata Party Protest, Election Commission Protest Mumbai

Dnyanesh Kumar Resignation, Abhijeet Dipke CJP, Cockroach Janata Party Protest, Election Commission Protest Mumbai

Follow Us
Follow Us:
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उद्यापर्यंत राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन छेडण्याची अभिजीत दीपके यांची घोषणा.
  • २ ऑक्टोबरपासून मुंबईतून आंदोलनाचा एल्गार पुकारला जाईल आणि त्यानंतर हे आंदोलन देशभरात पसरवले जाईल.
  • सोशल मीडियावरून देशवासियांना गांधी जयंतीच्या दिवशी “लोकशाही वाचवण्याची शपथ” घेण्याचे सीजेपीचे आवाहन
 

Abhijeet Dipke Demand Gyanesh Kumar Resignation: कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांत राजीनामा द्यावा, पण जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर, कॉकरोच जनता पार्टीकडून देशव्यापी आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जर ज्ञानेश कुमार यांनी उद्यापर्यंत आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, तर कॉकरोच जनता पक्ष (सीजेपी) २ ऑक्टोबर, गांधी जयंतीपासून एक मोठे आणि तीव्र देशव्यापी आंदोलन सुरू करेल, असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

देशव्यापी आंदोलनाची सुरुवात मुंबईतून

अभिजीत दीपके म्हणाले की, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतून या आंदोलनाला सुरुवात होईल. मुंबईतील भव्य आंदोलनानंतर, ही मोहीम देशभरातील इतर प्रमुख राज्ये आणि शहरांमध्ये विस्तारली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे, अभिजीत दीपके यांनी आपल्या पोस्टमध्ये “या गांधी जयंतीनिमित्त लोकशाही वाचवण्याची शपथ घेऊया.” असे आवाहनही केले आहे.

कॉकरोच जनता पक्षाच्या तीन मागण्या कोणत्या?

अभिजीत दिपके यांनी आपल्या पोस्टमधून तीन मागण्या केल्या आहेत.

ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. ही त्यांची पहिली मागणी आहे.

देशभरातली सर्व राज्यातील सर्व आगामी निवडणुका तातडीने स्थगित कराव्यात. जानेवारी २०२४ ची मतदार यादी तात्काळ प्रभावाने पुनर्संचयित करावी आणि एसआयआर प्रक्रियाही तातडीने थांबवण्यात यावी, अशी त्यांची दुसरी मागणी आहे.

निवडणूक आयुक्तांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणारा २०२३ चा कायदाही तातडीने रद्द करावा. नागरी समाजाचा समावेश असलेला एक नवीन कायदा लागू करावा, अशी सीजेपीने तिसरी मागणी केली आहे.

Maharashtra Student Election: महाराष्ट्रात ३३ वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका होणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय

निवडणूक आयोगाभोवतीचा हा संपूर्ण वाद नेमका काय आहे?

मतदार यादीशी संबंधित काही निर्णयांवरून  केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.’द इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत आयोगाच्या निर्णयांवर आणि आदेशांवर किमान १४ लेखी आक्षेप दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सुऱबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांचे आक्षेप डावलून निर्णय किंवा आदेश त्यांच्या माहितीशिवाय किंवा मंजुरीशिवाय जारी करण्यात आले होते. इतकेच नाही, तर एकाच दिवशी चार आक्षेप दाखल करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

ज्ञानेश कुमार यांच्यावर मनमानी निर्णय घेतल्याचा आरोप

कायद्यानुसार, निवडणूक आयोगाच्या कामकाजात शक्य असेल तेव्हा एकमत साधले पाहिजे आणि मतभेद झाल्यास बहुमताचा निर्णय स्वीकारला पाहिजे. या व्यवस्थेच्या असूनही, दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. याचवरून संपूर्ण देशात ज्ञानेश कुमारांविरूद्ध संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Cjp leader abhijit dipke demands resignation of cec gyanesh kumar mumbai protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • election commission of india
  • National Politics

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
1

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात
3

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

Cockroach Janata Party PC: ‘ज्ञानेश कुमार सर्वात मोठे देशद्रोही?’ अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
4

Cockroach Janata Party PC: ‘ज्ञानेश कुमार सर्वात मोठे देशद्रोही?’ अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.