Bjp chitra wagh on kondhawa 25 year old girl sexual assault by delivery boy pune crime news
पुणे : कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी (२ जुलै) रात्री हा प्रकार उघडकीस आला. कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा सर्व प्रकार घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. यामुळे पुण्यासह राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेवरुन भाजप आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
कोंढव्यामध्ये तरुणीवर डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणावरुन आता भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी रोष व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी या प्रकरणासंबंधी पोस्ट देखील केली आहे. तसेच शहरातील तरुण मुलींना देखील त्यांनी आवाहन केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेत्या व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये चित्रा वाघ यांनी लिहिले आहे की, “पुण्यातल्या कोंढव्यामध्ये एका 22 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. कुरिअर बॉय असल्याचा बनाव करत तो हरामखोर तिच्या दारावर आला. आणि सही करायला पेन विसरलो म्हणत पीडितेला पेन आणायला सांगितलं. जशी ती आतमध्ये गेली तसा तो घरात घुसला आणि त्याने आतुन दरवाजा लावला. तिच्यावर स्प्रे फवारून तिला बेशुध्द केलं आणि त्या हरामखोरानं तिच्यावर अत्याचार केला. इतकंच नाही पीडितेच्याच मोबाईलवर तिचा पाठमोरा फोटो काढला आणि कुणाला सांगितलं तर फोटो वायरल करेन असा टाईप केलेला मेसेज पोलिसांना मिळालाय,” अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “या हरामखोरानं ती मुलगी एकटीच घरी आहे याबद्दल रेकी केली असावी अस मला वाटतय अर्थात पोलिस चौकशीत ते समोर येईलचं. यासंबंधी मी संबंधीत पोलिस अधिकारींशी बोलणं केलं आहे त्या नुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुणे पोलिसांची शोध टीम आरोपीच्या मागावर आहे. फॉरेन्सीक टीम ही जागेवर पोहोचला आहे. लवकरच हरामखोर आरोपी पकडला जाईल. मागे ही अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. पाणी देता का म्हणत घरात घुसून अत्याचार करणारे हरामखोर आरोपी ही आपण पाहीलेत. त्यामुळे राज्यातील माझ्या सर्व बहिणींना- लेकींना माझी कळकळीची विनंती आहे.कायम जागरूक रहा… सतर्क रहा….माझ्या बहीणींनो मातांनो अडचणीत असाल तर तात्काळ 112 नंबरवर फोन करा पोलिसांची मदत घ्या,” असे आवाहन आमदार चित्रा वाघ यांनी राज्यातील महिला आणि तरुणींना केले आहे.
पुण्यातल्या कोंढव्यामध्ये एका 22 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.
कुरिअर बॉय असल्याचा बनाव करत तो हरामखोर तिच्या दारावर आला. आणि सही करायला पेन विसरलो म्हणत पीडितेला पेन आणायला सांगितलं. जशी ती आतमध्ये गेली तसा तो घरात घुसला आणि त्याने आतुन दरवाजा… pic.twitter.com/xsdHy3eowU
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 3, 2025