कोंढव्यात उच्चभ्रु सोसायटीत २५ वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार
Pune Crime News : कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत २५ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी (२ जुलै) रात्री हा प्रकार उघडकीस आला. कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा सर्व प्रकार घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे भासवून सोसायटीत प्रवेश मिळवला. दरवाज्यावर पोहोचल्यानंतर त्याने पीडितेला बँकेचं कुरिअर असल्याचे सांगितले. यानंतर जबरदस्तीने घरात प्रवेश करत पीडितेवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित तरूणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपीने वापरलेल्या मार्गाचा आणि ओळखीचा तपास करण्यात येत आहे. ही घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
IND vs ENG : 310 धावा, 5 विकेट्स… 1 शतक! पहिल्या दिनी भारतीय फलंदाजांचा बोलबाला; वाचा सविस्तर
शहरातील कोंढवा परिसरातल्या एका उच्चभ्रू आणि गार्डेड सोसायटीत २५ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२ जुलै) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणाचा पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला असून, आरोपीच्या शोधासाठी १० विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. पीडित तरुणी मूळची अकोल्याची असून, सध्या ती आपल्या भावासोबत कोंढव्यात राहत होती. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील एका खासगी कंपनीत काम करते.
प्राथमिक तपासानुसार, आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीत प्रवेश मिळवला. दरवाज्यावर आल्यानंतर त्याने बँकेचे कुरिअर असल्याचे सांगितले. पीडितेने हे कुरिअर आपले नसल्याचे सांगितले असतानाही आरोपीने “सही करावी लागेल” असा आग्रह धरला. त्यामुळे तरुणीने सेफ्टी डोअर उघडला. तेवढ्यात आरोपीने तिच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना घडल्यावर तरुणीला शुद्ध येताच पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
धक्कादायक ! वर्धा जिल्ह्यात चक्क श्वानावर लैंगिक अत्याचार; 67 वर्षीय ज्येष्ठाचं घृणास्पद कृत्य
ही संतापजनक घटना सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये घडल्याने सुरक्षाव्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉयचे रूप घेऊन प्रवेश मिळवला. सुरक्षारक्षकांकडून फारशी चौकशी झाल्याचे दिसून आले नाही. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, आरोपीच्या ओळखीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.