
BJP Cultural Minister Ashish Shelar participates in Bandra Fort Alcohol party
Bandra Fort Alcohol Party : मुंबई : ऐतिहासिक असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारु पार्टी झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या किल्ल्यावर उच्चभ्रू लोकांची पार्टी झाली. या पार्टीला परवानगी कोणी दिली यावर मोठा वाद निर्माण झाला. वांद्रे किल्ल्यावरील या पार्टीचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी शेअर केला. यावेळी त्यांनी ‘महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित करत महायुती सरकार, मुंबई पालिका आणि पर्यटन विभागाला धारेवर धरले. यानंतर आता वांद्रे किल्ल्यावरील या पार्टीमध्ये भाजप नेते आशिष शेलार देखील सहभागी असल्याचे समोर आले. त्यामुळे वांद्रे किल्ल्यावरील दारु पार्टी प्रकरण जोरदार तापणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी देखील शिवसेना ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिल आहे की, महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिका परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग ? नक्की काय सुरु आहे ? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी? असा प्रश्न अखिल चित्रे यांनी उपस्थित केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी या पार्टीमध्ये भाजप नेते आशिष शेलार हे देखील सहभागी असल्याचे दाखवून दिले. याचा फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, वांद्रे किल्ल्यावरील महाराष्ट्र पर्यटन विभाग प्रस्तुत ओली फेस्ट दारुपार्टीची दृश्य पाहून संताप आला होता ना? आता हा पहा अजून एक फोटो. त्याच इव्हेंटला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विशेष उपस्थिती लावतात. आता समजलं असेलच, ४८ तास उलटले तरी का कुणावर कारवाई झाली नाही. ‘किल्ले अडवा, अड्डे बनवा’ हे नवं धोरण सांस्कृतिक मंत्रालयाने हाती घेतलं आहे वाटतं ! आशिष शेलार हेच का सांस्कृतिक वारसा संवर्धन? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा पार्टीला राज्याचे मंत्रीच विशेष पाहुणे असतील तर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क कारवाई करतील का ? असा प्रश्न अखिल चित्रे यांनी उपस्थित केला आहे.
वांद्रे किल्ल्यावरील @maha_tourism प्रस्तुत ओली फेस्ट दारुपार्टीची दृश्य पाहून संताप आला होता ना?
आता हा पहा अजून एक फोटो. त्याच इव्हेंटला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विशेष उपस्थिती लावतात. आता समजलं असेलच, ४८ तास उलटले तरी का कुणावर कारवाई झाली नाही. ‘किल्ले अडवा, अड्डे… pic.twitter.com/VleKdsoZGt — Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) November 18, 2025