Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories India- भारतात 22 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,928 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,600 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,946 रुपये होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 23, 2026 | 11:50 AM
LIVE
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • 23 Feb 2026 11:50 AM (IST)

    23 Feb 2026 11:50 AM (IST)

    Muhammad Yunus यांचा पर्दाफाश! बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी उघड केला अंतरिम सत्तेचा

    बांगलादेशात सध्या तारिक रहमान यांचे नवे सरकार स्थापन झाले असून लोकशाही कार्याला सुरुवात झाली आहे. याच वेळी माजी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी अंतरिम सरकाराचा संपूर्ण जगासमोर पर्दाफाश केला आहे. युनूस यांच्यावर संविधान पायदळी तुडवण्यापासून ते राष्ट्रपतींना कैद करण्यापर्यंतचे गंभीर आरोप आहे.

  • 23 Feb 2026 11:40 AM (IST)

    23 Feb 2026 11:40 AM (IST)

    त्रिशुली नदीत जलसमाधी! पोखराहून काठमांडूला जाणाऱ्या बसला मोठा अपघात

    नेपाळमध्ये (Nepal) पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांवर काळाने भीषण झडप घातली आहे. पोखराहून राजधानी काठमांडूकडे निघालेली एक प्रवासी बस धाडिंग जिल्ह्यातील पृथ्वी महामार्गावर नियंत्रणाबाहेर जाऊन त्रिशुली नदीच्या पात्रात कोसळली. या हृदयद्रावक अपघातात १८ जणांना आपला जीव गमवावा लागला असून २६ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ६ महिला आणि १२ पुरुषांचा समावेश असून, या घटनेने संपूर्ण नेपाळसह आंतरराष्ट्रीय स्तरावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • 23 Feb 2026 11:30 AM (IST)

    23 Feb 2026 11:30 AM (IST)

    ‘जायंट किलर्स’ झिम्बाब्वे वेस्ट इंडिजला रोखण्यात यश मिळवणार का?

    २०२६ च्या T20 विश्वचषकात वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात एक महत्त्वाचा सामना होणार आहे. दोन्ही देशांनी गट टप्प्यात शानदार कामगिरी केली. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका सारख्या प्रमुख संघांना हरवून सुपर ८ मध्ये स्थान मिळवले. आता, वेस्ट इंडिजला हरवून सुपर ८ मध्ये चांगली सुरुवात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. वेस्ट इंडिजनेही आतापर्यंत प्रभावित केले आहे. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सुपर ८ सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा ते जाणून घेऊया.

  • 23 Feb 2026 11:20 AM (IST)

    23 Feb 2026 11:20 AM (IST)

    निवडणूक आयोगाने जाहीर केली आकडेवारी; एसआयआरनंतर ९ राज्यांत १.७ कोटी मतदारांची घट

    देशातील सहा राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार यादींचे विशेष सघन पुनरावृत्ती (Special Intensive Revision) पूर्ण झाले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या प्रक्रियेदरम्यान नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदारांची संख्या १७ लक्षांहून कमी झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एसआयआर सुरू होण्यापूर्वी गुजरात, पुडुचेरी, लक्षद्वीप, राजस्थान, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा आणि केरळ या नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारांची संख्या अंदाजे २१४.५ दशलक्ष होती.

  • 23 Feb 2026 11:10 AM (IST)

    23 Feb 2026 11:10 AM (IST)

    आयडीएफसी फर्स्ट बँकेचा धक्कादायक खुलासा; ५९० कोटींची संशयित फसवणूक?

    आयडीएफसी फर्स्ट बँकेत एक मोठा फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने शनिवारी बँकेसंबधित महत्त्वाचा खुलासा केला, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या चंदीगड शाखेत सुमारे ५९० कोटींचा संशयित फसवणूक आढळून आल्याचे म्हटले आहे, ज्यामध्ये हरियाणा सरकारच्या काही खात्यांचा समावेश आहे. बँकेने २१ फेब्रुवारी रोजी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या नियामक फाइलिंगमध्ये त्यांनी हरियाणा सरकारच्या एका विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर प्रारंभिक अंतर्गत चौकशी केल्याचे म्हटले आहे.

  • 23 Feb 2026 10:59 AM (IST)

    23 Feb 2026 10:59 AM (IST)

    नागपूरात बारावी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई

    नागपूर शहरात बारावी बोर्ड परीक्षेतील पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी आता दोघांना अटक केली आहे. कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला या प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

  • 23 Feb 2026 10:52 AM (IST)

    23 Feb 2026 10:52 AM (IST)

    आशा शर्मा बनल्या Microsoft Gaming च्या नवी सिईओ

    माइक्रोसॉफ्टने भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची गेमिंग विभागाच्या नवीन कार्यकारी उपाध्यक्ष आणि सीईओपदी निवड केली आहे. आशा शर्मा फिल स्पेंसर (Phil Spencer) यांची जागा घेणार आहेत, जे माइक्रोसॉफ्ट गेमिंगमध्ये गेल्या 4 दशकांपासून काम करत आहेत आणि आता निवृत्ती घेणार आहेत. सिईओ सत्या नडेला यांनी याबाबत घोषणा करत सांगितलं आहे की, मी गेमिंग आणि आमच्या ग्राहकांच्या महत्वकांक्षेच्या केंद्रस्थानी असलेल्या त्यांच्या भूमिकेबद्दल अतिशय उत्सुक आहे. मला ही घोषण करताना अतिशय आनंद होत आहे की, आशा शर्मा गेमिंग विभागाच्या नवीन कार्यकारी उपाध्यक्ष आणि सीईओ असणार आहेत आणि मला सपोर्ट करणार आहेत.

  • 23 Feb 2026 10:46 AM (IST)

    23 Feb 2026 10:46 AM (IST)

    आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य

    भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (इंडियन इर्नस्टट्‌यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी आयआयटीएम) यांनी विकसित केलेल्या दशकभराच्या नव्या हवामान अंदाज प्रणालीवरील संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ‘आयआयटीएम दशक हवामान अंदाज प्रणाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभ्यासात भारतीय उन्हाळी मान्सूनमधील वर्षानुवर्षे आणि दशकानुसार होणारे बदल, जागतिक हवामान घटकांशी त्याचे संबंध आणि प्रणालीची अचूकता यांचे सविस्तर मूल्यमापन करण्यात आले आहे. पावसाचे वितरण, तापमानातील त्रुटी तसेच विविध जागतिक हवामान चांचा मान्सूनवरील परिणाम अधिक नेमकेपणाने दर्शविण्यात ही प्रणाली यशस्वी ठरल्याचे अहवालात नमूद आहे.

  • 23 Feb 2026 10:39 AM (IST)

    23 Feb 2026 10:39 AM (IST)

    दिल्ली मेट्रोत पुन्हा घमासान

    सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र घटना आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या मेट्रोतील भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता मेट्रोतील भांडणाचा व्हिडिओ म्हटल्यावर सर्वांना अंदाज येतोच की हा दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ आहे. दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतेच. मेट्रोतील भांडणाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

  • 23 Feb 2026 10:31 AM (IST)

    23 Feb 2026 10:31 AM (IST)

    कुख्यात ड्रग माफिया ‘ El Mencho’ लष्करी कारवाईत ठार

    जगातील सर्वात क्रूर आणि ‘वॉन्टेड’ ड्रग्ज तस्करांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या नेमेसियो रुबेन ओसेगुएरा सर्व्हेंटेस उर्फ “एल मेंचो” (El Mencho) याचा लष्करी कारवाईत अंत झाला आहे. मेक्सिकोच्या (Mexico) संरक्षण मंत्रालयाने या ऐतिहासिक मोहिमेची माहिती दिली असून, या बातमीने संपूर्ण दक्षिण अमेरिकेत खळबळ उडाली आहे. एल मेंचोच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्याच्या टोळीने मेक्सिकोच्या रस्त्यांवर हिंसाचाराचा तांडव सुरू केला आहे.

  • 23 Feb 2026 10:24 AM (IST)

    23 Feb 2026 10:24 AM (IST)

    प्रकाश राजने साधला The Kerala Story 2 वर निशाणा

    “द केरळ स्टोरी २” या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ट्रेलरमध्ये एका मुस्लिम कुटुंबाकडून मुख्य भूमिकेतील अभिनेत्रीला जबरदस्तीने गोमांस खायला घातले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. रविवारी, अभिनेता प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाभोवती सुरू असलेल्या वादाबद्दल ट्विट केले आहे.

  • 23 Feb 2026 10:19 AM (IST)

    23 Feb 2026 10:19 AM (IST)

    लोखंडी रॉडने मारहाण अन्….;पीडितेची मृत्यूशी झुंज

    मुलींच्या अत्याचाराच्या घटनेने देशाला शरमेने मान घालावी लागली अशा घटना या आधी घडल्या आहेत. निर्भया बलात्कार आणि हत्याकांड हा प्रकरण अजूनही आपण विसरू शकलो नाही आहे. अजूनही ते प्रकरण आठवलं कि अंगावर शहारे येतात. एखादा व्यक्ती इतका कसा काय क्रूर असो शकतो? तो मनुष्य आहे की नाही? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आता असाच एक प्रकार गुरुग्राममध्ये देखील घडला आहे. एका नराधमाने आधी त्या मुलीला बंदी बनवून ठेवलं, त्यानंतर अमानुष मारहाण केली, एवढेच नाही तर सॅनिटायझरने तिचा प्रायव्हेट पार्ट जाळला. यामुळे ती कधीच आई होऊ शकणार नाही आणि एवढेच नाही तर तिला कधीच चालताही येणार आहे.

  • 23 Feb 2026 09:45 AM (IST)

    23 Feb 2026 09:45 AM (IST)

     'उदयनराजे केसरी' बैलगाडा शर्यतीत 'बकासूर-बादल'ने पटकावला प्रथम क्रमांक

    सातारा: सातारा तालुक्यातील लिंब येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'उदयनराजे केसरी' भव्य बैलगाडा शर्यतीत 'बकासूर आणि बादल' या बैलजोडीने बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या शर्यतीत या जोडीने आपल्या वेगाच्या जोरावर प्रथम क्रमांकावर नाव कोरले.

    शर्यतीचा थरार आणि बक्षिसांचा वर्षाव:

    रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर यांच्या वतीने या ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावर्षीच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या प्रथम क्रमांकाच्या १,५१,००७ रुपयांच्या रोख बक्षिसावर बकासूर आणि बादल जोडीने कब्जा केला.

  • 23 Feb 2026 09:39 AM (IST)

    23 Feb 2026 09:39 AM (IST)

    भाजपाने पुण्याचा तालिबान केला… हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

    Harshvardhan Sapkal News: “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती सारखीच आहे. पुण्याचे प्रथम नागरिक आंदोलनामध्ये पक्ष म्हणून सहभागी होतात, परंतु रामशास्त्री प्रभुणे यांच्या पुण्याचा भाजपकडून तालिबान केला आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्याक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान सोबत केल्याचा आरोप करत भाजपच्या पुणे शहर संघटनेने काँग्रेस भवनावर मोर्चा काढला होता.

  • 23 Feb 2026 09:25 AM (IST)

    23 Feb 2026 09:25 AM (IST)

       'भाऊच्या धक्क्या'वर बसला स्पर्धकांना धक्का, कोण झाले घराबाहेर?

    मुंबई: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सध्या कमालीच्या वळणावर येऊन पोहोचला आहे. घरातील सदस्यांमधील वाद, एकमेकांविरुद्धची रणनीती आणि बदललेली समीकरणे यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, खेळाकडे गांभीर्याने न बघणे एका स्पर्धकाला चांगलेच महागात पडले असून, सहाव्या आठवड्यात एका सदस्याचा प्रवास संपला आहे.

    नऊ स्पर्धकांवर होती टांगती तलवार

    सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया अत्यंत चुरशीची ठरली होती. घराबाहेर जाण्यासाठी तब्बल नऊ स्पर्धक शर्यतीत होते: रोशन, सागर, राकेश, दीपाली, अनुश्री, रुचिता, सचिन, प्रभू आणि प्राजक्ता. या सर्वांमध्ये 'वोटिंग ट्रेंड्स'नुसार कोण वाचणार आणि कोणाचा निरोप मिळणार, याची चर्चा संपूर्ण आठवडाभर सोशल मीडियावर रंगली होती.

  • 23 Feb 2026 09:20 AM (IST)

    23 Feb 2026 09:20 AM (IST)

    दोन दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ, पण नशिबी 'जीवघेणा' प्रवास

    भंडारा/चंद्रपूर: देशात विकासाचे मोठे दावे केले जात असताना, महाराष्ट्र-चंद्रपूरच्या सीमेवर मात्र एक विदारक वास्तव पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील ईटान आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी, ही दोन गावे स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. आजही येथील ग्रामस्थांना वैनगंगा नदी ओलांडण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून 'नावेतून' प्रवास करावा लागत आहे.

    हाय-प्रोफाईल मतदारसंघ, पण विकास संथ

    विशेष म्हणजे, ही दोन्ही गावे राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांच्या कार्यक्षेत्रात येतात:

    • ईटान (भंडारा): हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा गृह मतदारसंघ (साकोली) आहे.

    • कोलारी (चंद्रपूर): हा भाजपचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय बंटी भांगडिया यांचा मतदारसंघ (चिमूर) आहे.

  • 23 Feb 2026 09:15 AM (IST)

    23 Feb 2026 09:15 AM (IST)

    अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहिणी खडसेंची  मोठी मागणी

    मुंबई: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असतानाच, राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना घेरले आहे.

    अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी व्हावी

    रोहिणी खडसे यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सर्वपक्षीय आमदारांना आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांच्या मृत्यूमागे काही गूढ दडलेले आहे का, हे समोर आणण्यासाठी सर्व पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनात सरकारला जाब विचारला पाहिजे.या प्रकरणातील संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने ठोस उत्तर देणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • 23 Feb 2026 09:08 AM (IST)

    23 Feb 2026 09:08 AM (IST)

    मुंबई महानगरपालिकेत   राज सुर्वे शिवसेनेचे (शिंदे गट) पहिले स्वीकृत नगरसेवक

    मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या (Co-opted Councilors) निवडीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत २९ जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. या संख्याबळानुसार शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन स्वीकृत नगरसेवक पदांपैकी पहिल्या जागेवर राज सुर्वे यांची वर्णी लागली आहे.

  • 23 Feb 2026 09:04 AM (IST)

    23 Feb 2026 09:04 AM (IST)

    IND vs SA Live Score : डेविड मिलरचे अर्धशतक!

    India vs South africa Live Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुपर 8 चा तिसरा सामना खेळवला जात आहे. भारताचे संघाने पावर प्ले मध्ये जबरदस्त सुरुवात केली पण त्यानंतर डेव्होल्ड ब्रेविस आणि डेविड मिलर या दोघांची जबरदस्त भागीदारी पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले फलंदाजी करत पहिला इनिंग मध्ये सात विकेट्स गमावून 187 धावा केल्या आहेत. भारतीय संघाला विजयासाठी 188 धावांची गरज आहे.

  • 23 Feb 2026 08:58 AM (IST)

    23 Feb 2026 08:58 AM (IST)

    ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

    भारतीय बाजारातील आपली पकड मजबूत करण्यासाठी Nissan ने नवी Nissan Gravite MPV लाँच केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट 7-सीटर कार असून खास कुटुंबासाठी डिझाइन करण्यात आली आहे. कमी किमतीत उत्तम जागा, आधुनिक फीचर्स आणि सुरक्षितता देण्याचा कंपनीचा दावा आहे. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.65 लाख रुपये ठेवण्यात आली असून त्यामुळे ती देशातील सर्वात किफायतशीर 7-सीटर कार्सपैकी एक ठरते.

    प्रीमियम फीचर्समुळे वेगळी ओळख

    Nissan Gravite ही Renault Triber वर आधारित असल्याचे मानले जाते; मात्र यात अधिक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये इंटीग्रेटेड ड्युअल डॅशकॅम मिळतो, जो ड्राइव्हदरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. याशिवाय JBL चा प्रीमियम साउंड सिस्टम देण्यात आला आहे, ज्यामुळे संगीताचा अनुभव अधिक उत्कृष्ट होतो. केबिनमधील हवा शुद्ध ठेवण्यासाठी इन-बिल्ट एअर प्युरिफायरही देण्यात आला आहे. हे खास फीचर्स Tekna ट्रिममध्ये उपलब्ध असून, सेगमेंटमध्ये तिला वेगळी ओळख देतात.

  • 23 Feb 2026 08:54 AM (IST)

    23 Feb 2026 08:54 AM (IST)

    IND vs SA : चालू सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा

    Washington Sundar-David Miller : २०२६ च्या टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने भारताला पहिला पराभव दिला. या महत्त्वाच्या सुपर ८ सामन्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले आणि त्यांना ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक डेव्हिड मिलर होता. सामन्यादरम्यान एका क्षणी मिलरचा राग भडकला आणि तो वॉशिंग्टन सुंदरशी वाद घालू लागला. हाय-व्होल्टेज नाट्यमय वातावरणात पंचांनी हस्तक्षेप केला.

  • 23 Feb 2026 08:53 AM (IST)

    23 Feb 2026 08:53 AM (IST)

    Trump यांच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक!

    Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. ट्रम्प यांच्या मार-ए-लागोतील खाजगी निवासस्थानी एका अज्ञात तरुणाने सशस्त्र घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु त्याला सुरक्षा दलांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत ठार केले. मात्र या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

Maharashtra to World Breaking News:

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदी खरेदीचा विचार करताय?

Gold Rate Today: भारतात 23 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,927 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,599 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,945 रुपये आहे. भारतात 23 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,59,270 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,19,450 रुपये आहे. भारतात 23 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 274.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,74,900 रुपये आहे.

 

 

Web Title: Maharashtra breaking news 23th february live udates in marathi politics war gold sliver rates cricket sports crime share market live maharashtra national international updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”
1

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”

Maharashtra Politics : अनिकेत तटकरेंनी केले DCM सुनेत्रा पवारांच्या गाडीचे सारथ्य; सुषमा अंधारेंनी साधला निशाणा
2

Maharashtra Politics : अनिकेत तटकरेंनी केले DCM सुनेत्रा पवारांच्या गाडीचे सारथ्य; सुषमा अंधारेंनी साधला निशाणा

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन
3

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

Karjat News : कर्जत पंचायत समितीत सत्ताकारणात ट्विस्ट; महिला सभापतीवरून पुरुष सदस्य नाराज
4

Karjat News : कर्जत पंचायत समितीत सत्ताकारणात ट्विस्ट; महिला सभापतीवरून पुरुष सदस्य नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.