महापौरपदाचे आरक्षण ठरणार 'गेमचेंजर', नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा धगधगणार; पक्षांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका (फोटो सौजन्य-X)
महापौरपद अमरावती राजकारणाचा केंद्रबिंदू २०२२ ते २०२५ या कालावधीत लोकप्रतिनिधींची सभा अस्तित्वात नसल्याने महापौरपद रिक्त राहिले. भाजपचे चेतन गावंडे हे या पदावरील शेवटचे निवडून आलेले प्रतिनिधी, अमरावतीतील महापौरपद हे केवळ सत्तेचे प्रतीक नसून पक्षीय प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे. गेल्या दोन दशकांपासून डॉ. सुनील देशमुख, जगदीश गुप्ता आणि आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये सुरू असलेली राजकीय रस्सीखेच आजही तीव्र आहे. यामुळे महापौरपद कोणाला मिळते यावरून शहरातील राजकीय वर्चस्व ठरते, अशी धारणा कायम आहे.
आरक्षण ठरवेल सर्वांची दिशाः नऊ वपनिंतर होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार, याची उत्सुकता उच्चांक गाठली आहे. जर पद सर्वसाधारण खुले राहिले, तर दावेदारीचा ‘मेगा‘ संघर्ष होणार. जर पद महिला प्रवर्गात गेले, तर अनेक पक्षांना नेतृत्व बदलावे लागेल, जर अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण आल्यास राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. राजकीय जाणकारांच्या मते, आरक्षण जाहीर होईपर्यंत सर्व पक्षांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. मात्र आरक्षण घोषित होताच नवी आघाड्या, नवीन गटबाजी आणि सत्तेच्या आकांक्षा कळसाला जाणार, हे निश्चित. अमरावतीच्या महापौरपदाचे आरक्षण हे येणाऱ्या निवडणुकीचे ‘ट्रिगर पॉइंट’ ठरणार असून शहरातील राजकारण कोणत्या दिशेने वळेल हे याच एका घोषणेतून स्पष्ट होणार, असा ठाम राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
१९९२ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यापासून महानगरपालिकेने अमरावती अपक्ष राजकारणापासून पक्षीय सत्तेपर्यंतचा मोठा प्रवास अनुभवला आहे. एकेकाळी अपक्ष नगरसेवकांचे वर्चस्व आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेला राजकीय ‘खेळ’ हा नगरपालिका राजकारणाचा केंद्रबिंदू होता. २००२ नंतर पक्षीय राजकारण बळकट झाले आणि महापौरपदाभोवती पक्षीय स्पर्धा तीव्र झाली. १९९७ मध्ये भाजप शिवसेना युतीची सत्ता आणि २३ जागांवर भाजपचा कब्जा, त्यानंतर काँग्रेसचा अनपेक्षित उलटफेर आणि अपक्ष विलास इंगोले यांना मिळालेले तीन वर्षांचे महापौरपद ही सर्व घडामोडी आजही राजकारणातील ‘टर्निंग पॉइंट‘ म्हणून ओळखल्या जातात. पुढील दोन दशकांत काँग्रेसचे डॉ. दीपाली गवळी, मिलिंद चिमोटे, अशोक डोंगरे तर भाजपचे संजय नरवणे आणि चेतन गावंडे यांनी महापौरपदी काम पाहिले. आजवर पाच महिला महापौर झाल्या आहेत, ही बाबही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.
Ans: 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर (EVM) घेण्यात येणार आहे.
Ans: एकूण मतदान केंद्र - १३,३५५
Ans: "३१ जानेवारीच्या पूर्वी आम्हाला सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत. कोणत्याही परिस्थिती निवडणुका घ्या, असे आदेश आहेत."






