bjp girish mahajan reaction on eknath shinde nashik visit
नाशिक : उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. तर महाराष्ट्रामध्ये पुढच्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. नाशिकमध्ये 2026मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यावरुन राज्यामध्ये राजकारण सुरु झाले आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा करुन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावर आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकांच्या निमित्ताने महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरुन सुरु असलेलं कोल्डवॉर समोर आलं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीला पालकमंत्र्यांकडे अध्यक्षस्थान असणं आवश्यक आहे. पण नाशिकच पालकमंत्री पद अजून निश्चित झालेलं नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक बोलवली. एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते या ठिकाणी बैठक घेत आहेत. काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी वेगळी बैठक बोलवली होती. तिन्ही बैठकांच कारण वेगळं सांगण्यात आलं होतं. मात्र तिन्ही नेत्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत बैठक घेतली आहे. यामुळे महायुतीमध्ये कुंभमेळ्यावरुन चढाओढ सुरु असल्याचे दिसून येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत माध्यमांशी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारले आहेत. गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीचे आमंत्रण असल्याचे सांगितले आहे. गिरीश महाजन म्हणाले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नाशिक दौरा आहे. नाशिक दौऱ्यावर असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळा संदर्भात आढावा बैठक बोलवली आहे व त्याचं मलाही आमंत्रण आहे. मुख्यमंत्री जळगाव जिल्ह्यात येत असल्याने त्या तयारीसाठी नाशिक येथील आढावा बैठकीला मी जाऊ शकलो नाही याचा अर्थ आमच्यात कुठे अंतर पडले असा कोणी काढू नये,” अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात बैठक घेतली त्या बैठकीलाही मी जाऊ शकलो नाही. कुंभमेळावा ही सरकारमधील सगळ्यांची सामुहिक जबाबदारी आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंदर्भात बैठक घेतली तर त्यात गैर काय? दादा भुसे यांनी देखील कुंभमेळा संदर्भात सविस्तर मोठी बैठक घेतली. त्यावेळी देखील मी आमंत्रित नव्हतो मी म्हटलं नाही मला बैठकीला का बोलवलं नाही? कुंभमेळा हा यावेळेस मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी बैठका घ्याव्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घ्यावी ही आमची सर्वांची जबाबदारी आहे,” अशा शब्दांत उत्तर देत गिरीश महाजन यांनी मतभेद नसल्याचे म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, “उद्या कोणी दुसऱ्या नेत्यांनी ही बैठक घेतली तर त्यात गैर नाही आणि प्रत्येक बैठकीला मी गेलो पाहिजे असंही नाही. एकनाथ शिंदे यांच्या आढावा बैठकीचे निमंत्रण मला मिळालेला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे मी जाऊ शकत नाही. पण बैठकीत ज्या काही एकना शिंदे यांच्या सूचना असतील त्या मी जाणून घेणार आहे. अतिशय सुंदर असा कुंभमेळा आम्हाला करायचा आहे त्यामुळे त्यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही,” असे मत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.