
BJP Instructions to newly elected corporators regarding Mumbai bmc mayor government formation
बीएमसी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवेसना शिंदे गट यांच्या महायुतीला बहुमत मिळालं असून त्यामुळे आता मुंबई महापालिकेवर त्यांचाच भगवा फकणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 89 तर शिंदेच्या शिवसेनाला 29 जागा मिळाल्या आहेत. भाजप हा मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही सत्तास्थापनेसाठी त्यांना शिंदे गटाची गरज लागणार आहे. तर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सर्व नगरसेवक हे एका हॉटेलमध्ये ठेवले आहेत. याचबरोबर शिंदेंनी महायुतीमध्ये अडीच वर्षाच्या महापौर पदाची मागणी केली असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे राजकारणामध्ये नवा ट्वीस्ट आला आहे. शिंदेंनी त्यांचे नगरसेवक हे हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे भाजपने देखील त्यांच्या नगरसेवकांना खास सूचना दिल्या आहेत.
हे देखील वाचा : शिंदे सेनेतील एक गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत…; तानाजी सावंतांचे खळबळजनक विधान
निवडणुकीच्या निकालानंतर आता नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण होण्याची शत्यता आहे. त्यामुळे भाजपकडून सावध भूमिका घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एक महत्वाचे पाऊल टाकले असून ” पुढील आठ दिवस मुंबईबाहेर जाऊ नका” अशा सूचा नवनिर्वाचित नगरसेवकांना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आठ ते दहा दिवस लागणार आहेत . त्यामुळे कोणीच मुंबईबाहेर जाऊ नये अशा सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यावर भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकतं, तोपर्यंतचा प्रत्येक दिवस अतिशय महत्वाचा असून त्याच पार्श्वभूमीवर भाजपसाठी नगरसेवकांना नीट राहण्याच्या आणि मुंबईबाहेर न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा :राजकारणात मोठा भूकंप! ‘उबाठा’चे नगरसेवक फुटणार? नेमका विषय काय?
यापूर्वी देखील निवडणूक एकत्र लढल्यानंतर सत्ता स्थापनेवेळी भाजपला धोका मिळाला आहे. त्यामुळे यावेळी सावधगिरी बाळगली जात आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील अडीच वर्षांची मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यात आली होती. यानंतर आता अडीच वर्षांची महापौर पदाची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील देवाच्या मनामध्ये असेल तर शिवसेनेचा महापौर होईल असे वक्तव्य केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.