
BJP leader and minister Pankaja Munde calms down a crying baby on stage
बीड जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रम सुरू असताना उपस्थितांमध्ये असलेल्या एका दहा महिन्याच्या गोंडस बाळाकडे पंकजा मुंडे यांची नजर गेली. त्यांनी लगेचच बाळा उचलून मंचावर घेतले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी रडणाऱ्या बाळाला शांत करत त्याला जवळ घेतले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री पंकजा मुंडे यांनी चालू कार्यक्रमामध्ये रडणाऱ्या बाळाला कुशीमध्ये घेतले. बाळ रडत असल्याचे पाहताच त्यांनी तत्काळ बाळाला आपल्या जवळ घेतले. यावेळी पंकजा मुंडे यांची मायेची ममता दिसून आली. पंकजा मुंडे यांनी प्रेमाने गोंजारताच बाळ शांत झाले. तब्बल चार मिनिटे पंकजा मुंडे आणि ते बाळ एकमेकांत रमले होते. हा मायेचा देखणा प्रसंग पाहून उपस्थित सर्वच मान्यवर आणि प्रेक्षक भावूक झाले होते.
राजकीय नेते हे अनेकदा आपली कठोर आणि कणखर बाजू मांडताना दिसून येतात. आक्रमक भाषणांमधून ते आपली भूमिका मांडत असतात. विरोधकांना सडेतोड उत्तर देताना राजकीय नेते दिसून येतात. मात्र पंकजा मुंडे यांचा हा मायाळूपणा सर्वांना भावला आहे. सोशल मीडिया पंकजा मुंडे यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून मुंडे समर्थकांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीडमधील एका कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांचा भाषणामध्ये आक्रमक पवित्रा दिसून आला. त्या म्हणाल्या की, “बजरंगआप्पा तुमचा बॅनर पाहिला आणि त्यावर लिहिले होते दबंग खासदार…पण माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. मी अखेरच्या श्वासापर्यंत मी जिल्ह्याची पालक म्हणून काम करणार आहे. माझं नाव नाही घेतले नाही तरी चालेल पण प्रितम ताईचे नाव घेतल्याशिवाय चालणार नाही. बजरंग आप्पा तुम्ही नशीबवान आहात कारण नांगरले कोणी आणि त्याचे पीक घेतले कोणी… गोपीनाथ मुंडे खासदार झाल्यावर त्यांनी रेल्वेसाठी मोठा निधी आणला. विलासराव देशमुख यांनी त्यावेळी तत्वत: मान्यता दिली पण त्याला प्रत्यक्ष निधी दिला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांनी 6 दिवस मंत्री म्हणून जगले पण त्यांच्या बद्दल कोणाच्या मनात किंतुपरंतु नसावा. स्पेशल व्हेईकल परपज म्हणून केंद्र आणि राज्याने 2600 कोटी निधी मान्यता दिली. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे दिले,” असे मत पंकजा मुंडे यांनी मांडले आहे.