Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“काँग्रेसचा पप्पू, फक्त उडाणटप्पू !” भाजप नेत्याची राहुल गांधींवर टीका

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्टीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना 'देशाचे गद्दार' म्हणून म्हणून संबोधले आहे. अश्यातच आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधींवर चांगलाच निशाणा साधला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 21, 2026 | 09:52 PM
BJP leader Keshav Upadhye slams Congress leader Rahul Gandhi, Rahul Gandhi slams PM Narendra Modi,

BJP leader Keshav Upadhye slams Congress leader Rahul Gandhi, Rahul Gandhi slams PM Narendra Modi,

Follow Us
Follow Us:

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्टीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना ‘देशाचे गद्दार’ म्हणून म्हणून संबोधले आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी (२० मे) उत्तर प्रदेश येथील रायबरेली या आपल्या मतदारसंघात दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात राजकीय खळबळ निर्माण झाली असून सत्ताधाऱ्यांनी यावरून राहुल गांधी यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे. अश्यातच आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधींवर चांगलाच निशाणा साधला आहे. “काँग्रेसचा पप्पू, फक्त उडाणटप्पू !” असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

काय म्हणाले केशव उपाध्ये?

केशव उपाध्ये यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ते यावेळी म्हणाले,” देशप्रेम म्हणजे काय, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिकवण्याची मुळीच गरज नाही, पप्पू शेठ! अखंड हिंदुस्तानासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे असंख्य कार्यकर्ते संघाने घडवले आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मा. गृहमंत्री अमितभाई शाह हे संघाच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व आहे. काँग्रेसच्या या ‘रिजेक्टेड नेत्या’ला देशप्रेम शिकवण्यासाठी चीनमधून स्क्रिप्ट येते, त्याच्याकडून शहाणपणाची अपेक्षा तरी काय करायची?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.

काँग्रेसचा पप्पू, फक्त उडाणटप्पू ! देशप्रेम म्हणजे काय, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिकवण्याची मुळीच गरज नाही, पप्पू शेठ! अखंड हिंदुस्तानासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे असंख्य कार्यकर्ते संघाने घडवले आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मा. गृहमंत्री अमितभाई शाह हे… pic.twitter.com/CPdVY2Tfkk — Keshav Upadhye (@keshavupadhye) May 21, 2026

पुढे ते म्हणाले, “देशाचा स्वाभिमान कोणी गहाण ठेवला? काश्मीरची बिकट अवस्था कोणी निर्माण केली? खोटी आश्वासने देत वर्षानुवर्षे सत्ता कोणी उपभोगली? याची उत्तरे आधी आपल्या घरात शोधावीत. पणजोबा, आजी आणि वडिलांच्या काळातील इतिहास वाचला, तर वास्तव समोर येईल. काँग्रेसने देशद्रोहाचे आणि तुष्टीकरणाचे भंपक विचार पेरले, त्याचीच फळे आज मिळत आहेत. सलग निवडणुका हरत असतानाही आत्मपरीक्षण करण्याऐवजी देशभक्तांवर टीका करणे, हीच काँग्रेसची परंपरा झाली आहे. आज भारताच्या ऐंशी टक्के भूभागावर भाजपाची सत्ता आहे. संघ परिवार आणि भाजपा नेतृत्वावर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे; त्यासाठी तुमच्यासारख्या ‘रिजेक्टेड नेत्या’च्या प्रमाणपत्राची गरज नाही!”

तामिळनाडूत काँग्रेसला ‘अच्छे दिन’; तब्बल 59 वर्षांनंतर राज्य मंत्रिमंडळात मिळाले स्थान

राहुल गांधींवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, “मिस्टर पप्पू, जी काही राज्ये काँग्रेसच्या ताब्यात आहेत, तिथला भ्रष्टाचार, अवैध धंदे आणि प्रशासनाची अवस्था आधी पाहा. कुणालाही गद्दारीचे प्रमाणपत्र देऊन काँग्रेसला उभारी मिळेल, असे वाटत असेल तर तो भ्रम आहे. अमेरिका आणि चीनची चमचेगिरी म्हणजे अभिमान आणि बाकी सगळे गद्दार, ही मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. डोळे उघडा आणि पाहा — आज भारत प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी झेप घेत आहे. आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाची नवी उंची गाठत आहे. आणि हो… असेच भंपक वक्तव्य करत राहा; देशप्रेमी जनता लोकशाही मार्गाने त्याला योग्य उत्तर देत राहील!” अश्या शब्दांत त्यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

रायबरेली येथील आपल्या मतदारसंघात दौऱ्यावर असताना एका सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि आरएसएस हे रोज राज्यघटनेवर हल्ला करत असून त्यांनी देशाचे हितसंबंध निवडक उद्योगपतींना विकले आहे. जेव्हा संघाचे कार्यकर्ते तुमच्या घरी येऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांना सांगा कि त्यांची संघटना, मोदी आणि शहा हे गद्दार आहेत. त्यांनी आपला देश विकण्याचे काम केले. त्यांनी आपल्या राज्यघटनेवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यावर हल्ला केला,” अशी टीका त्यांनी यावेळी केली. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून भाजपच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

“पंतप्रधान मोदी, अमित शहा देशाचे गद्दार,” राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशभरात खळबळ

Web Title: Bjp leader keshav upadhye slams congress leader rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

India Australia Uranium Deal: चीनची होणार जळफळाट,ऑस्ट्रेलिया देणार भारताला युरेनियम; दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार
1

India Australia Uranium Deal: चीनची होणार जळफळाट,ऑस्ट्रेलिया देणार भारताला युरेनियम; दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार

PM Narendra Modi : ‘दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर प्रहार…’, मेलबर्नमधील भाषणात मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा केला उल्लेख
2

PM Narendra Modi : ‘दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर प्रहार…’, मेलबर्नमधील भाषणात मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा केला उल्लेख

PM Modi in Australia: भारत-ऑस्ट्रेलिया भागीदारीत ‘शिक्षण’ बनला मजबूत स्तंभ; आता बेंगळुरूनंतर ‘या’ शहरांमध्ये सुरू होणार कॅम्पस
3

PM Modi in Australia: भारत-ऑस्ट्रेलिया भागीदारीत ‘शिक्षण’ बनला मजबूत स्तंभ; आता बेंगळुरूनंतर ‘या’ शहरांमध्ये सुरू होणार कॅम्पस

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला
4

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.