"पंतप्रधान मोदी, अमित शहा देशाचे गद्दार," राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशभरात खळबळ
रायबरेली येथील आपल्या मतदारसंघात दौऱ्यावर असताना एका सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जेव्हा संघाचे कार्यकर्ते तुमच्या घरी येऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांना सांगा कि त्यांची संघटना, मोदी आणि शहा हे गद्दार आहेत. त्यांनी आपला देश विकण्याचे काम केले. त्यांनी आपल्या राज्यघटनेवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यावर हल्ला केला,” अशी टीका त्यांनी यावेळी केली. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून भाजपच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. .
भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी यावरून राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. “राहुल गांधी यांचे वक्तव्य देशातील १४० कोटी नागरिकांचा अपमान आहे. या वक्तव्यामधून निवडणुकीतील पक्षाच्या पराभवामुळे झालेली त्यांची निराशा दिसून येते. त्यांचा मानसिक तोल ढासळला आहे. ज्या व्यक्तीने दहशतवादी घटनांना आळा घातला. माओवाद संपवला आणि जगात तिरंग्याबद्दलचा आदर वाढवला, अश्या व्यक्तींसाठी तुम्ही असे शब्द वापराल का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
OBC Non Creamy Layer: राज्य सरकारचा मोठा निर्णय; OBC नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादेत मोठी वाढ शक्य
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यावरून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ‘X’ अकाऊंटवरून टीका करत ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. त्यातून त्यांची गोंधळलेली मानसिकता दिसून येते. राजकारणात वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु लोकशाहीतील घटनात्मक पदांवर असलेल्या नेत्यांनी अशी भाषा आणि शब्द वापरणे अत्यंत निंदनीय आहे. हा देशवासीयांच्या भावनांचा अपमान आहे. देशातील जनतेने काँग्रेस पक्षाच्या या द्वेषपूर्ण राजकारणाला सडेतोड उत्तर दिले आहे आणि यापुढेही देत राहील,” असे ते यावेळी म्हणाले.
शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?






