Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ टाळण्यासाठी आघाडीने केली ‘अशी’ खेळी; जिल्हा परिषदेच्या 36 सदस्यांना थेट…

18 मार्च रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 15, 2026 | 07:56 AM
सांगलीत 'ऑपरेशन लोटस' टाळण्यासाठी आघाडीने केली 'अशी' खेळी; जिल्हा परिषदेच्या 36 सदस्यांना...

सांगलीत 'ऑपरेशन लोटस' टाळण्यासाठी आघाडीने केली 'अशी' खेळी; जिल्हा परिषदेच्या 36 सदस्यांना...

Follow Us
Follow Us:

सांगली / प्रवीण शिंदे : सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेचांना कमालीची धार आली असून ‘ऑपरेशन लोटस’चा संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपूर्वी दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडीच्या 30 सदस्यांसह अजित पवार गटाच्या सहा सदस्यांना शनिवारी परराज्यात सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. या अचानक झालेल्या हालचालींमुळे सत्तेचा दावा करणाऱ्या भाजपाला निवडीपूर्वीच राजकीय धक्का बसल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

61 सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 31 सदस्यांची आवश्यकता आहे. निवडणुकीच्या निकालात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. महाविकास आघाडीचे 30 सदस्य निवडून आले असून भाजप व मित्रपक्षांचे 18 सदस्य आहेत. शिवसेना (शिंदे गट) सात तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सहा सदस्यांसह सत्तासमीकरणातील निर्णायक घटक ठरले आहेत.

दरम्यान, 18 मार्च रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार गटातील जिल्हास्तरीय नेत्यांमध्ये पाठिंब्याबाबत मतभेद असले तरी बहुतांश नेते महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे संकेत मिळत आहेत.

दुसरीकडे, भाजपकडून राज्यस्तरावरून दबाव टाकत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येत होता. मात्र, संभाव्य ‘ऑपरेशन लोटस’चा डाव रोखण्यासाठी आघाडीने सदस्यांना एकत्रितपणे सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचे 30 आणि अजित पवार गटाचे सहा असे मिळून 36 सदस्य एका ट्रॅव्हल्समधून परराज्यात रवाना झाले आहेत. रविवारी ते निश्चित स्थळी एकत्र राहणार असून निवडीच्या दिवशी (18 मार्च) सकाळी थेट जिल्हा परिषदेत उपस्थित राहणार आहेत.

संख्याबळ पुरेसे नसतानाही भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा

भाजपकडे संख्याबळ अपुरे असतानाही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता. शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. तसेच आघाडीचे सदस्य फोडण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’ची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आघाडीने सदस्यांना सुरक्षितस्थळी हलवत हा संभाव्य डाव आधीच हाणून पाडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सांगली जिल्हा परिषद सत्ता गणित

एकूण सदस्य : 61
बहुमतासाठी आवश्यक : 31
पक्षनिहाय संख्या :
महाविकास आघाडी – 30
भाजप व मित्रपक्ष – 18
शिवसेना (शिंदे गट) – 7
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 6
सध्या आघाडीच्या बाजूने संभाव्य संख्या : 36

अध्यक्ष राष्ट्रवादी (शरद पवार गट), उपाध्यक्ष काँग्रेसला?

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता अधिक मजबूत मानली जात आहे. आघाडीच्या नेत्यांमध्ये पदांचे प्राथमिक वाटपही ठरल्याची माहिती पुढे आली आहे.

अध्यक्षपद : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
संभाव्य नावे : संगिता पाटील (कासेगाव) / संध्या पाटील (वाटेगाव)
उपाध्यक्षपद : काँग्रेस
संभाव्य नाव : ऋषीकेश लाड
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर सभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार असून सावित्री तम्मनगौडा रवी-पाटील, स्नेहल मोरे, अर्जुन पाटील, दादासाहेब कोळेकर आणि अमित पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

हेदेखील वाचा : Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात की घातपात? ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये छेडछाड होत असल्याचा रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Web Title: Bjp makes moves to secure power in the sangli zilla parishad mva also taken big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 07:56 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Operation Lotus

संबंधित बातम्या

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
1

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
2

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
3

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.