Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लिम व्यक्तीस मारहाण; जय श्रीराम बोल म्हणण्याचा करत होते आग्रह…

सत्ताधारी नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून राज्यामध्ये मनमानी सुरु असल्याचे दिसून येत आहे. बीड, जालनामधील प्रकारानंतर आता कणकवलीमधील प्रकरण समोर आले आहे. यामुळे नितेश राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 12, 2025 | 05:49 PM
Disha Salian Case News bjp nitesh rane press conference targets aditya thackeray

Disha Salian Case News bjp nitesh rane press conference targets aditya thackeray

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणारी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राज्याचे वातावरण तापलेले असताना आणखी प्रकरणे समोर येत आहेत. सत्ताधारी नेत्यांचे कार्यकर्ते एकप्रकारे गुंडागिरी करत असल्याचे आरोप केले जात आहेत. धनंजय मुंडे, सुरेश धस यांच्यानंतर आता भाजप नेते व आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणेच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लिम व्यक्तीस मारहाण करत जय श्रीराम म्हणण्याचा करत होते आग्रह केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधीमंडळाच्या आवारामध्ये या मुस्लीम कुटुंबाने येत न्यायाची मागणी केली आहे. पीडित मुस्लीम दाम्पत्य हे कणकवलीमधील असल्याचे सांगितले जात आहे. या पीडित व्यक्तीचे नाव अशरफ शेख असे असून ते पत्नीसह विधीमंडळाच्या आवारामध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर त्यांची व्यथा मांडली असून न्यायाची मागणी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अशरफ शेख यांच्या पत्नी यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, कणकवलीमध्ये आम्ही एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो. तिथून येताना पनवेलमध्ये ही घटना घडली. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मी एकटी हिजाब घालून होते. तिथे सगळी कॉंलेजची 30 ते 35 लोक होते. ते आम्हाला बघून जय श्रीराम अशा घोषणा देत होते. ते यावर थांबले नाहीत. त्यांनी आम्हाला जय श्रीराम म्हणा म्हणून दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी मला आणि माझ्या नवऱ्याला मारहाण केली. आम्ही पनवेलला तक्रार केली, असे त्या महिलेने सांगितले.

याचबरोबर अशरफ शेख यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. मडगाव एक्सप्रेस ट्रेनमध्ये जय श्रीराम बोलण्यासाठी आमच्यावर दबाव आणला, आम्ही बोलण्यास नकार दिला तेव्हा त्या मुलांनी माझ्या ४ वर्षाच्या मुलीवर चहा फेकली. मला आणि बायकोला मारहाण केली. याची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली. रेल्वेने पनवेलमध्ये मदत मिळेल सांगितले, पण तोपर्यंत सगळे आरोपी पळून गेले. पनवेलची केस कणकवली येथे ट्रान्सफर करण्यात आली. कणकवली आम्ही जबाब द्यायला गेलो तेव्हा तिथे नितेश राणेंसमोर कार्यकर्त्यांनी आम्हाला मारले. आमच्या घरी येऊनही आम्हाला मारहाण करण्यात आली. तालुका अध्यक्ष सोनू सावंत, वरवडे गावचा उपसरपंच अमोल बोंद्रे असे अनेक कार्यकर्ते होते त्यांनी मारल्याचं अशरफ शेख यांनी दावा केला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, आम्हाला न्याय हवा. आमच्यासोबत जो अन्याय झाला त्यात न्याय द्या. २५ जानेवारी २०२४ ला घटना घडली होती. आरोपींना अटकच केली नाही. नितेश राणेंचा राजीनामा घ्या आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी अशरफ शेख यांच्या कुटुंबाने केली आहे. त्यात ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत कारवाईची मागणी केली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

Web Title: Bjp minister nitesh ranes workers beat up muslim family kankavli crime case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • BJP
  • Nitesh Rane
  • political news

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.