BJP MP Bansuri Swaraj insulted national anthem, video viral Congress alleges
Bansuri Swaraj National Anthem insult video : नवी दिल्ली : दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज्य यांच्या कन्या आणि खासदार बांसुरी स्वराज या वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकल्या आहेत. कॉंग्रेस नेत्यांकडून खासदार बांसुरी स्वराज यांच्या राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला. एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीत सुरु असताना बांसुरी स्वराज या बोलण्यासाठी माईक जवळ गेल्याचा आरोप करण्यात आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर खासदार बांसुरी स्वराज्य यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
भाजप खासदार बांसुरी स्वराज यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रगीताचा “अनादर” केल्याचा आरोप केला. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर बांसुरी स्वराज यांनी आता या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांना असा दावा केला की व्हायरल व्हिडिओ अपूर्ण असून दिशाभूल करणारा आहे. या व्हिडिओमधून चुकीची माहिती दाखवली जात आहे. नवी दिल्लीतील भाजप खासदार स्वराज म्हणाल्या की त्या कधीही राष्ट्रगीताचा अनादर करणार नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की व्हिडिओमध्ये त्या त्यांच्या जागेवरून हलताना दिसत आहेत, परंतु सत्य हे आहे की त्या राष्ट्रगीत पूर्णपणे आणि योग्यरित्या गायले जावे अशी विनंती करण्यासाठी तिथे गेल्या होत्या. “मी तिथे राष्ट्रगीत पूर्णपणे आणि आदराने गायले जावे अशी विनंती करण्यासाठी गेलो होते,” असे स्पष्टीकरण खासदार बांसुरी स्वराज यांनी दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडियावर अर्धवट व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि जोरदार टीका होत असल्यामुळे बांसुरी स्वराज यांनी पूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. बांसुरी स्वराज यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवर संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की व्हायरल क्लिप एडिट करण्यात आली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “हा संपूर्ण व्हिडिओ आहे, जिथे आम्ही अभिमानाने राष्ट्रगीत गायले. कृपया अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट मत बांसुरी स्वराज यांनी व्यक्त केले आहे.
सोशल मीडिया पर अधूरा वीडियो फैलाया जा रहा है। सच्चाई ये है कि मैंने आग्रह किया था कि राष्ट्रगान पूरा और सही ढंग से गाया जाए। यह पूरा वीडियो है जहाँ हमने गर्व और सम्मान के साथ पूरा राष्ट्रगान गाया। 🇮🇳@BJP4India @BJP4Delhi pic.twitter.com/SQ7nmFuwW4
— Bansuri Swaraj (@BansuriSwaraj) September 17, 2025
काँग्रेस नेत्याने केला आरोप
हा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूर यांनी उपस्थित केला. त्यांनी एक अपूर्ण व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले की, “भाजप खासदार राष्ट्रगीताचा अपमान करत आहेत. पंतप्रधान मोदी, त्यांना तुरुंगात पाठवा किंवा देशात दोन संविधान आहेत हे मान्य करा – एक सामान्य माणसासाठी आणि दुसरे भाजप नेत्यांसाठी.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बांसुरी स्वराज कोण आहेत?
बांसुरी स्वराज ही दिवंगत भाजप नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची कन्या आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश केला आणि नवी दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आल्या आहेच. बांसुरी यांनी वॉरविक (यूके) विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये कायद्याचा अभ्यास केला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बासुंरी स्वराज्य यांना 15 वर्षांचा कायदेशीर अनुभव आहे आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे.
या संपूर्ण वादाला सोशल मीडियावर जोर आला आहे. काँग्रेस याला भाजपची “दुहेरी देशभक्ती” म्हणत असताना, भाजप समर्थकांचे म्हणणे आहे की अपूर्ण माहितीच्या आधारे बांसुरी स्वराज यांना लक्ष्य केले जात आहे.