
Maharashtra Politics: लेकीसाठी बापाचा त्याग! 'या' कारणासाठी नेत्याने दिला पदाचा राजीनामा
रत्नागिरी जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
भाजपाच्या राजकारणात अचानकपणे ट्विस्ट
राजीनाम्याबाबत तर्कवितर्क सुरू
रत्नागिरी: राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. राज्यातील नगरपालिकांच्या आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका येत्या २ डिसेंबरला होणार आहेत आणि या निवडणुकींची तयारी आता जोरात सुरू झाली आहे रत्नागिरीतही रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीत एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. आपली मुलगी शिवानी ही उबाठामधून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उभी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष असलेले राजेश सावंत यांनी आज आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे राजकीय खळबळ निर्माण झाली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष पद असलेले राजेश सावंत यांची मुलगी शिवानी सावंत ही उबाठाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांची सून आहे आणि रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाण्याची जोरदार शक्यता आहे. उबाठातर्फे शिवानी सावंत माने यांना रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाण्याची जोरदार शक्यता आहे.
नैतिकता म्हणून सावंतांनी दिला राजीनामा
या पार्श्वभूमीवर नैतिकता म्हणून राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हा राजीनामा स्वीकारला आहे का याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोणताही खुलासा केलेला नाही, परंतु याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. या राजीनाम्यामागे लेकीच्या राजकीय करिअरच गणित असल्याची चर्चा देखील मतदादरसंघात होत आहे.
राजीनाम्याबाबत तर्कवितर्क सुरू
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बुधवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी खेड येथून कार्यकत्यांचे पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेत नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकत्यांची पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यांच्याशी संवाद साधला, त्यादरम्यानच रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांनी आपली असमर्थता दर्शवत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा चव्हाण यांच्याकडे सोपविला आहे. आपली मुलगी विरोधी पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढवणार असेल तर काम करणे अवघड जाईल या हेतूनेच राजेश सावंत यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
Maharashtra Politics: कोकणात महायुती डळमळणार; ‘या’ नगरपरिषदेसाठी भाजप स्वबळाचा नारा देणार?
नगरपरिषदेसाठी भाजप स्वबळाचा नारा देणार?
कोकणात नगरपरिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक यांची तयारी सुरू झाली आहे महायुतीकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठका कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य मोठ आहे. अशातच अलीकडे प्रवेश केलेले वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपला निवडणुकीच्या तोंडावर बळ मिळाल आहे. त्यामुळे थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेड येथे पदाधिकारी बैठक व कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहात करण्यात आल आहे. याच कार्यक्रमात नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून निवडणुकीसाठी दंड थोपटण्यात येणार असून भाजपा खेड नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा करण्याची शक्यता आहे.