Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : वैभव खेडेकर यांच्या प्रवेशानंतर भाजपाची मोठी खेळी! खेड नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा?

कोकणात नगरपरिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक यांची तयारी सुरू झाली आहे महायुतीकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठका कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 04, 2025 | 08:32 PM
Ratnagiri News : वैभव खेडेकर यांच्या प्रवेशानंतर भाजपाची मोठी खेळी! खेड नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा?
Follow Us
Close
Follow Us:
  • वैभव खेडेकर यांच्या प्रवेशानंतर भाजपाची मोठी खेळी
  • खेड नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा?
  • निवडणुकीचं पारडं कोणाच्या बाजूने झुकणार ?
रत्नागिरी : कोकणात नगरपरिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक यांची तयारी सुरू झाली आहे महायुतीकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठका कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य मोठ आहे. अशातच अलीकडे प्रवेश केलेले वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपला निवडणुकीच्या तोंडावर बळ मिळाल आहे त्यामुळे थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेड येथे पदाधिकारी बैठक व कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहात करण्यात आल आहे. याच कार्यक्रमात नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून निवडणुकीसाठी दंड थोपटण्यात येणार असून भाजपा खेड नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा करण्याची शक्यता आहे. खेड नगरपरिषद निवडणुकीसाठी वैभव खेडेकर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. खेडेकर यांचा पक्षप्रवेश दोनदा हुकला होता त्यानंतर तिसऱ्या वेळेला हा पक्षप्रवेश झाला आता थेट रवींद्र चव्हाण यांच्याच उपस्थितीत या प्रवेशानंतर पहिलीच बैठक व कार्यकर्ता मेळावा होत असल्याने मोठ्या राजकीय घोषणेची शक्यता आहे.

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द! नियमितीकरणासाठी कोणतेही शुल्क नसल्याची मंत्री बावनकुळेंची घोषणा

मनसेच्या स्थापनेनंतर राज्यात पहिली नगरपरिषद निवडून आणण्याचा मान वैभव खेडेकर यांनी मिळवला होता.त्यांनी खेडमध्ये मनसेची बहुमताने सत्ता आणली होती. खेड नगर परिषद चे वैभव खेडेकर हे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. खेड शहर परिसरावर त्यांची मोठी कमांड आहे. त्यामुळे आता खेड नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपा स्वबळाची घोषणा करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. वैभव खेडेकर यांच्याबरोबर प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या नियुक्ती देण्यात आले आहेत. खेडमध्ये होणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचीही चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेड मध्ये होणाऱ्या 5 नोव्हेंबर रोजी च्या कार्यक्रमात नेमकी कोणती घोषणा होते कोणती भूमिका मांडली जाते हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहे.

खेड नगरपरिषद निवडून आणण्यासाठी वैभव खेडेकर यांच्याकडून उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली आहे. खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे महिला राखीव पडल आहे. त्यामुळे खेड नगराध्यक्ष पदाची संधी ही वैभव खेडेकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांना मिळण्याची शक्यता आहे. वैभव खेडेकर हे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव व संपर्क लक्ष्यात घेऊन भाजपाकडून वैभवी खेडेकर यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर वैभव खेडेकर यांना निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याची संधी असून यामध्ये यश मिळाल्यास वैभव खेडेकर यांची पुढील वाटचाल महत्वाची ठरवणार आहे.

Election Commission: मतचोरी आज नाही तर अनेक वर्षांपासून सुरु; भाजपच्या समर्थकाने अखेर केले कबुल

Web Title: Ratnagiri news bjps big move after vaibhav khedekars entry self supporting announcement for khed municipal council elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 08:32 PM

Topics:  

  • BJP
  • Kokan News
  • Maharashtra Politics
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

रविंद्र धंगेकरांची ‘ती’ भूमिका भाजपला खटकली? पुण्यात भाजप-शिवसेनेच्या बैठकीला बोलावलंच नाही
1

रविंद्र धंगेकरांची ‘ती’ भूमिका भाजपला खटकली? पुण्यात भाजप-शिवसेनेच्या बैठकीला बोलावलंच नाही

काँग्रेसला धक्का ! प्रज्ञा सातव यांच्यानंतर आता ‘या’ बड्या नेत्याने शेकडो कार्यकर्त्यांसह केला भाजपमध्ये प्रवेश
2

काँग्रेसला धक्का ! प्रज्ञा सातव यांच्यानंतर आता ‘या’ बड्या नेत्याने शेकडो कार्यकर्त्यांसह केला भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Politics : ‘जागा वाटपाची चर्चा तुटेपर्यंत ताणू नका’; सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचं विधान
3

Maharashtra Politics : ‘जागा वाटपाची चर्चा तुटेपर्यंत ताणू नका’; सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचं विधान

Maharashtra Politics : काँग्रेसला खिंडार! 2 माजी महापौरांसह 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
4

Maharashtra Politics : काँग्रेसला खिंडार! 2 माजी महापौरांसह 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.