Rehabilitate small entrepreneurs in Kudalwad MLA Mahesh Landge instructions to PCMC News
पिंपरी चिंचवड : राज्यामध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. यामध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळाले आहे. घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुती पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. महायुतीकडून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र महायुती एकत्रितपणे निवडणूक लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील दोन वर्षांहून अधिक काळ निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक कामे रखडली असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगताप यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर शंकर जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भाजप नेते व शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून प्रशासनाच्या माध्यमातून जी काही जनतेची कामे थांबली आहेत, म्हणून आम्ही सर्वजण महानगर पालिकेतील माजी नगरसदस्य शहरातील पाणी, रस्ते, विकास आणि इतर कामांसाठी आयुक्तांकडे आलो होतो. त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, शहरातील सर्वात महत्त्वाचा वाहतूक कोंडीचा मार्ग सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, पाण्याचा आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही गेलो होते. या बैठकीला उपस्थित असलेले सर्वजण सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची कामे करतात. सध्या लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आमच्या या नगरसदस्यांकडे लोक येतात. जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही याठिकाणी आलो आहोत, असे मत शंकर जगताप यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत शंकर जगताप यांनी सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, शंभर टक्के, सर्व जागा भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही लढणार आहे, लोकसभा आणि विधानसभेपर्यंत महायुती होती. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे, स्वबळावरती आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था लढवणार आहोत, मी ज्या पक्षाचं प्रतिनिधीत्व करतो, त्या पक्षाचे महानगपालिकेमध्ये आधीपेक्षा देखील आता जास्तीचे नगरसदस्य निवडून आणण्याचा आमचा माणस आहे, असंही शंकर जगताप यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.