Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Municipal Corporation: लातूर मनपात स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स संपला; अधिकृत निवड आज होणार

लातूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी सात जणांची नावे निवडीआधीच पक्षश्रेष्ठींनी जाहीर करुन सस्पेन्सची लॉटरी फोडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 10, 2026 | 11:22 AM
टक्केवारीसाठी २६ कोटींची कामे थांबवली; भाजप शहराध्यक्ष अजितसिंह कव्हेकर यांचा सनसनाटी आरोप

टक्केवारीसाठी २६ कोटींची कामे थांबवली; भाजप शहराध्यक्ष अजितसिंह कव्हेकर यांचा सनसनाटी आरोप

Follow Us
Follow Us:
  • स्वीकृत नगरसेवकांची ‘लॉटरी’ फुटली
  • काँग्रेसचे चार, भाजपचे दोन, वंचितला एक जागा
  • लातूरकरांची आता उत्सुकता संपली
 

Latur Municipal Corporation: लातूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी सात जणांची नावे निवडीआधीच पक्षश्रेष्ठींनी जाहीर करुन सस्पेन्सची लॉटरी फोडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. काँग्रेसकडून चार, भाजपकडून दोन तर वंचितकडून एक जागा निश्चित करण्यात आली आहे. काँग्रेसकडून प्रो. शिवाजी जवळगेकर, अफजल कुरेशी, प्रो. बसवराज धरणे आणि अॅड. किरण जाधव यांची तर वंचित बहुजन आघाडीकडून बाबा पठाण यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेविषयक क्षेत्रात सक्रिय असलेल्या या व्यक्तींना पक्षाने संधी दिल्याने विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व मनपात मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस

भारतीय जनता पक्षाकडून प्रदीप मोरे आणि भीमा बेंबळकर यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. पक्ष संघटनेत सक्रिय असलेल्या या कार्यकर्त्यांवर पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवला आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिक्षण, सामाजिक कार्य, सांस्कृतिक क्षेत्र तसेच विविध क्षेत्रांतील योगदान लक्षात घेऊन निवड करण्यात येते. त्यानुसार विविध क्षेत्रातील प्रतिनिधींना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवकांनी शहरातील नागरिकांच्या समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच विकासकामांवर प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

काँग्रेस, भाजप, वंचितच्या जाहीर झालेल्या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यासाठी निवड प्रक्रिया मंगळवारी १० मार्च रोजी पार पडणार आहे. त्यानंतर लातूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांचा अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. लातूर महानगरपालिकेच्या सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देविदास काळे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती भाजपचे शहराध्यक्ष अजित पाटील-कव्हेकर यांनी दिली. महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी देविदास काळे यांच्या नावावर पक्षाने एकमताने शिक्कामोर्तब केले आहे. आगामी कालावधीत ते विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

Latur News: ई-चलन दंडाविरोधात लातूरमध्ये वाहतूकदारांचा चक्का जाम; चुकीचे ई-चलन रद्द करण्याची मागणी

भाजपच्या महानगरपालिका गटनेतेपदी अॅड. दीपक मठपती यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली. मठपती यांच्या निवडीमुळे भाजपच्या मनपा गटाला अधिक बळ मिळणार आहे. नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर अॅड. दीपक मठपती यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत विकासाचा निर्धार व्यक्त केला आहे.

Web Title: Suspense over approved corporators in latur municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • BJP
  • Latur
  • Latur Municipal corporation Election 2026

संबंधित बातम्या

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
1

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
2

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
3

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?
4

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.