Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News : सुरेश खाडेंच्या बालेकिल्ल्यात भगदाड; अजितराव घोरपडेंचा राजकीय डाव यशस्वी

भाजपची सत्ता उलथवून टाकत राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे यांनी जोरदार राजकीय चाल खेळली. या घडामोडीमुळे भाजपला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील सत्तासमीकरणेच बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 10, 2026 | 07:24 PM
Sangli News : सुरेश खाडेंच्या बालेकिल्ल्यात भगदाड; अजितराव घोरपडेंचा राजकीय डाव यशस्वी
Follow Us
Follow Us:
  • सांगली राजकारणात मोठा राजकीय स्फोट
  • भाजपच्या हातातील सत्ता हिसकावून घेतली
  • स्थानिक राजकारणात शेवटच्या क्षणी कलाटणी
Sangli News : सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या तोंडावरच जिल्ह्यातील राजकारणात मोठा राजकीय स्फोट झाला आहे. मिरज पंचायत समितीत आमदार सुरेश खाडे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची सत्ता उलथवून टाकत राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे यांनी जोरदार राजकीय चाल खेळली. या घडामोडीमुळे भाजपला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील सत्तासमीकरणेच बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Sangali News : शिक्षण घ्यावं तरी कसं ? 42 शिक्षक पदं रिक्त; दोन-तीन तुकड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल

भाजपच्या हातातील सत्ता हिसकावून घेतली

मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या नरवाड गणातील अवघ्या २१ वर्षीय तन्वी कमलेकर यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या राणी भोरे यांचा ११ विरुद्ध १० मतांनी थरारक पराभव करत भाजपच्या हातातील सत्ता हिसकावून घेतली. तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांची निवड झाली.

स्थानिक राजकारणात शेवटच्या क्षणी कलाटणी

मिरज पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला २२ पैकी १० जागा मिळाल्या होत्या. तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडे राष्ट्रवादी (३), काँग्रेस (३), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (४) आणि शिवसेना (२) अशा एकूण १२ जागा होत्या. सुरुवातीला भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी मिळून ‘महायुती’ची सत्ता येईल अशी चर्चा रंगली होती. मात्र स्थानिक राजकारणात शेवटच्या क्षणी नाट्यमय कलाटणी मिळाली.

११ सदस्यांनी एकत्र येत भाजपचा पराभव

राष्ट्रवादीचे नेते अजित घोरपडे आणि शिवसेनेचे स्थानिक नेते मोहन वनखंडे यांनी महाविकास आघाडीची बाजू मजबूत करण्याचा निर्धार केला. घोरपडे यांनी आपल्या तीन सदस्यांना महाविकास आघाडीसोबत उभे करत भाजपच्या सत्तेवरच घाव घातला. मतदानाच्या वेळी शिवसेनेचा एक सदस्य अनुपस्थित असतानाही राष्ट्रवादी (३), काँग्रेस (३), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (४) आणि शिवसेना (१) अशा ११ सदस्यांनी एकत्र येत भाजपचा पराभव निश्चित केला.

मिरजमध्ये भाजपची प्रतिष्ठा धुळीस अशा चर्चा

या सत्तांतरामुळे मिरजमध्ये भाजपची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा पराभव आमदार सुरेश खाडे यांच्या बालेकिल्ल्यात झाल्याने भाजपसाठी हा राजकीय धक्का अधिकच तीव्र मानला जात आहे.

Kolhapur News : हॉटेल व्यावसायिकांचा पर्यावरणाशी ‘खेळ’ सुरू ;शहरातील हॉटेल्समुळे होतंय जलप्रदुषण!

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपूर्वीच झालेल्या या उलथापालथीमुळे सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी आक्रमक मोडमध्ये आली असून भाजपसमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. आगामी जिल्हा परिषद सत्तास्थापनेवरही या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Web Title: Sangli politics ajitrao ghorpade vs suresh khade miraj update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • BJP
  • Congress Politics
  • sangali
  • Sangli Politics

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
4

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.