Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली जिल्हा परिषदेत भाजपची ‘टांगती तलवार’; राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 12, 2026 | 04:20 PM
Sangli ZP Power Struggle: BJP in Trouble as NCP Splits Over Alliance Decision

Sangli ZP Power Struggle: BJP in Trouble as NCP Splits Over Alliance Decision

Follow Us
Follow Us:
  • सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा पेच अद्यापही कायम
  • भाजपच्या नेत्यांकडून महायुतीतील घटक पक्षांवर दबाव
  • महाविकास आघाडीला फक्त एका जागेची कमतरता
Sangli ZP Politics: सांगली जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. भाजप प्रणित महायुतीकडे संख्याबळ असले तरी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. त्यातच राष्ट्रवादीमध्येही अंतर्गत वाद सुरू असल्याने भाजपच्या हातातून सत्ता जाणार असल्याची शक्यता आहे. भाजपच्या बाजुने असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हेदेखील एकटे पडल्याचे चर्चा आहे.

भाजपच्या (BJP) नेत्यांकडून महायुतीतील घटक पक्षांवर दबाव टाकला जात आहे. या दबावाला कंटाळून राष्ट्रवादी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला दूर ठेवण्यासाठी योजना आखत असल्याचे बोलले जात आहे.

सगळं संपणार! पुण्यात हॉटेल्स, मेसचे लॉकडाउन? विद्यार्थी अन् कामगार ‘गॅस’वर, चिंता वाढली

दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपला पाठिंबा द्यायचा की, महाविकास आघाडीला, यावरून अजित पवार यांच्या रष्ट्रवादीत दोन मतप्रवाह आहेत. निशिकांत पाटील हे भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही आहेत, तर इतर नेत्यांकडू महाविकास आघाडी सोबत म्हणजेच आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेत आहेत. निशिकांत पाटील हे जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक असल्याने ते एकटे पडल्याचे दिसत आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपासून भाजप नेते गोपीचंद पडळकर सात्याने टिका टिप्पण्या करत असल्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड संताप आहे. त्यातच सांगली महापालिके भाजपकडून इतर घटक पक्षांना सातत्याने डावलले जात असल्याची भावना आहे. त्यामुळे पडळकर यांच्यावरही अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीकडे अगदी काठावरचे बहुमत आहे. तर महाविकास आघाडीला फक्त एका जागेची कमतरता आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींकडून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला एक महिना उलटून गेला असला तरी महायुतीला अद्यापही सत्तेचे गणित जुळवता आलेले नाही. त्यातच भाजपला राष्ट्रवादीकडूनही कोणताही प्रतिसाद मिळताना दिसत नाही. निशिकांत पाटील भाजपसोबत सत्ता स्थापन्यासाठी आग्रही असले तरी त्यांनाही पाठिंबा मिळालेला नाही.

Crime News: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! दरोड्याचा कट उधळला; पळून आलेल्या मुलाची सुटका

राष्ट्रवादीचे इतर नेते माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख हे नेते मात्र महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवरून राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य जिल्हा नेतृत्वाला दिले आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत बोलावलेल्या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याने आता सर्व भिस्त स्थानिक पातळीवरील समीकरणांवर अवलंबून आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे अद्याप वरिष्ठ पातळीवरून अधिकृत आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपंकडे सध्या १६ जिल्हा परिषद सदस्य आहेत, ज्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांचा आकडा ८ इतका आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पडळकर यांना पाठिंबा देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

सत्तेचे गणित:
सुरुवातीला जो पक्ष अध्यक्षपदाचा पहिला मान देईल, त्याला पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. मात्र, पडळकर यांच्या विरोधामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील सत्तास्थापनेचा पेच अधिक वाढण्याची शक्यता आहे. भाजप आपल्या कोट्यातील ८ सदस्य असलेल्या पडळकरांना बाजूला सारून राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Sangli zp power struggle bjp in trouble as ncp splits over alliance decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • BJP
  • gopichand padalkar
  • jayant patil
  • Nationalist Congress Party
  • Sangli Politics
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे…’, बंडखोर खासदारांवर एकनाथ शिंदेचं सूचक विधान; तर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
1

‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे…’, बंडखोर खासदारांवर एकनाथ शिंदेचं सूचक विधान; तर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Aaditya Thackeray: ‘तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं…’; ६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2

Aaditya Thackeray: ‘तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं…’; ६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’, नितेश राणेंचा घणाघात, थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला
3

‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’, नितेश राणेंचा घणाघात, थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला

उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवार गटाला धक्का? ‘तुतारी’चे पाच खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
4

उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवार गटाला धक्का? ‘तुतारी’चे पाच खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.