प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अजित पवारांच्या बारामती अपघातावर संशय घेतला (फोटो - सोशल मीडिया)
रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संशय व्यक्त केला आहे. याबाबत माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले की, “हजार टक्के जोपर्यंत स्थिती येत नाही तोपर्यंत उतरत नाही अशी गाईड लाईनच आहे. एवढी जोखीम त्या पायलटण कशी घेतली संबंधित अधिकाऱ्यांना कशी घेतली..अजित पवार उपमुख्यमंत्री असताना जर अशा प्रकारचे अपघात होत असतात तर आमच्या यंत्रणा किती किळस झालेले आहे हे दिसून येतं,” अशा शब्दांत बच्चू कडू यांनी अपघातावर संशय घेतला आहे.
हे देखील वाचा : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…
पुढे ते म्हणाले की, “अजित पवारांची फाईल भाजपकडे होती. भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपणही फाईल ठेवू शकतो. त्यांची फाईल जर भाजपने भारी पडत असेल तर हे किंतु परंतु, पुन्हा निर्माण होते. लोकशाही लोक पाहिजे म्हणतात पण लोकशाहीजोगते लोक तर पाहिजे.. इथं लोकशाहीजोगते लोक राहिले नाही.. धर्म, जात नाही तर पैसा या तीन गोष्टींनी लोकशाहीला खाल्ले आहे.. शेतकऱ्यांनीच मतं नाही मारली का भाजपच्या कमळाला.. आम्ही पाऊसमुळे आंदोलन मागे घेतलं तर बोंबाल्ले.. आता तर तुम्ही महत्त्वाचं भाजपने मारले मग आता कुठे गेले तुमचे जय जवान जय किसान.. आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षांना भाड्याने घ्यावे लागते,” असा टोला बच्चू कडू यांनी भाजपला लगावला आहे.
हे देखील वाचा : ‘अजित पवारांच्या अपघातप्रकरणाचा खुलासा सरकारने तात्काळ करावा’; ‘या’ बड्या नेत्याची मागणी
पुढे माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले की, “पूर्वी सिविल सर्जनला औषध घेण्याचे अधिकार होते.. आता सगळे औषधी घेण्याचे अधिकार ठेवले मंत्रालयात.. लावला गेम बरोबर कमिशन खा औषध महाग करा.. न खाऊंगा ना खाने दूंगा सबसे ज्यादा देश के अंदर खाने वाला है तो बीजेपी है… टेंडर देण्यासाठी पैसे खाते.. एमआरइजीएसचे पैसे अजून भेटले नाही.. लाडकी बहिणीचे पैसे महिन्याचे पैसे भेटले नाही… अपंगाचे पगार वेळेवर नाही.. ज्याला दोन पाय नाही साले हो त्याचे पगार वेळेवर देत नाही.. तुमच्या कुठं मारावं रे… माराची वेळ नाही आली आता.. आम्ही पाहतोय वेळ आली तर मारू कानफटात…” अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.






