Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उंब्रज जिल्हा परिषद गटात भाजपचा विजय; गणांमध्ये ‘तुतारी’ आणि ‘हात’ची एंट्री

प्रत्येक फेरीत मतांची आघाडी कमी-जास्त होत असल्याने दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. अखेर निकाल जाहीर होताच उंब्रजमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 10, 2026 | 11:08 AM
उंब्रज जिल्हा परिषद गटात भाजपचा विजय; गणांमध्ये तुतारी आणि 'हात'ची एंट्री

उंब्रज जिल्हा परिषद गटात भाजपचा विजय; गणांमध्ये तुतारी आणि 'हात'ची एंट्री

Follow Us
Follow Us:

उंब्रज : कराड उत्तर मतदारसंघातील उंब्रज जिल्हा परिषद गटात रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाने गट पातळीवर विजय मिळवला आहे. असे असले तरी गणांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले आहे. बहुरंगी झालेल्या या निवडणुकीत खरी चुरस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि भाजप यांच्यातच झाली.

या थरारक लढतीत भाजपचे उमेदवार रणजित जाधव यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रत्येक फेरीत मतांची आघाडी कमी-जास्त होत असल्याने दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. अखेर निकाल जाहीर होताच उंब्रजमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.

उंब्रज गट हा परंपरेने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मनोजदादा घोरपडे यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पराभव करून कराड उत्तरमध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण केले होते. त्यानंतर जिल्हा परिषद गटही भाजपकडे वळवण्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष केंद्रीत केले होते. त्यांचे नियोजन आणि संघटनबळ यामुळे गटात कमळ फुलले. मात्र, पंचायत समिती गणांमध्ये वेगळे चित्र दिसून आले.

उंब्रज गणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या संगीता चव्हाण यांनी विजय मिळवत ‘तुतारी’चा नाद कायम ठेवला. तर तळबीड गणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार संग्राम पवार यांनी बाजी मारत ‘हाताचा पंजा’ उंचावला. एकूणच उंब्रज जिल्हा परिषद गटात भाजपला गट पातळीवर यश मिळाले असले तरी गणांमध्ये मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कराड उत्तरमधील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार बनले असून, आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांना नव्या रणनीती आखाव्या लागणार आहेत.

उंब्रजमध्ये भाजपची सरशी; पंचायत समितीत राष्ट्रवादी-काँग्रेसचा झेंडा

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती मतमोजणीत उंब्रज गटात चुरशीची लढत रंगली. जिल्हा परिषद गटात भाजपचे रणजीत कृष्णराव जाधव यांनी 10534 मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संग्रामसिंह जयवंतराव जाधव यांनी 9,767 मते घेत जोरदार टक्कर दिली. मनसेचे रणजीत जगन्नाथ कदम (650), शिवसेना (उबाठा) चे सुनील प्रकाश पाटील (468) आणि शिवसेनेचे महादेव दिनकर साळुंखे (2,412) यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता चव्हाण यांचा विजय

उंब्रज पंचायत समिती गणात मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता संजय चव्हाण यांनी 4,522 मते घेत विजय संपादन केला. भाजपच्या शशिकला लिंगेश फगणे (4,483) यांना अल्प फरकाने पराभव पत्करावा लागला, तर शिवसेनेच्या प्रियंका विक्रम वाघमारे (1,774) तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

तळबीडमध्ये संग्राम अधिकारी विजयी

तळबीड पंचायत समिती गणात काँग्रेसचे संग्राम अधिकारी पवार यांनी 5,842 मते मिळवत स्पष्ट विजय मिळवला. भाजपचे उमेश मारुती मोहिते (4,055) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयवंत लाला मोहिते (2,719) यांना मागे टाकत काँग्रेसने येथे आपली ताकद दाखवून दिली. या निकालामुळे उंब्रज परिसरात जिल्हा परिषदेत भाजपची सरशी झाली असली, तरी पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसने प्रभावी कामगिरी करत राजकीय समीकरणे अधिक रंगतदार केली आहेत.

हेदेखील वाचा : Dharashiv Panchayat Samiti Result 2026: धाराशिव पंचायत समितीवर भाजपचे कमळ फुलले! सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग

Web Title: Bjp wins in umbraj zilla parishad group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • nagar panchayat elections
  • ZP Politics

संबंधित बातम्या

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
1

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
2

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Live breaking News in Marathi: अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर
3

Maharashtra Live breaking News in Marathi: अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा
4

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.