
केरळच्या निवडणुकीत भाजपने उघडले खाते
डाव्या पक्षांच्या सत्तेला लावला सुरुंग
एलडीएफची 40 वर्षांनी झाला पराभव
BJP News: भाजपने दक्षिणेत मोठी कामगिरी केली आहे. भाजप गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र पक्षाला म्हणावे तसे यश प्राप्त झालेले पाहायला मिळाले नाही. मात्र केरळमधील निवडणुकी भाजपने खाते उघडले आहे. डाव्या पक्षांच्या सत्तेला भाजपने सुरू लावला आहे. यामुळे केरळच्या राजकरणात भूकंप झाला आहे.
केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. केरलची राजधानी तिरूवअनंतपुरममध्ये भाजपने एलडीएफची सत्ता उधळून लावली आहे. भाजपने एलडीएफची 4 दशकांची सत्ता उधळून लावली आहे. भाजपचा हा विजय केरळमध्ये नव्या राजकारणाचा अध्याय असल्याचे समजले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील तेथील जनतेचे आभार मानले आहेत.
तिरूवअनंतपुरममध्ये गेल्या 40 वर्षांपासून एलडीएफ म्हणजेच डाव्या लोकशाही आघाडीची सत्ता होती. आता या महानगरपालिकेत भाजपचे कमळ फुलले आहे. निकालामुळे राजकारणात भूकंप झाला आहे. डाव्या लोकशाही आघाडीला मोठा धक्का समजला जात आहे. तिरूवअनंतपुरम केवळ केरळची राजधानी नसून राजकीय दृष्ट्या देखील महत्वाचे केंद्र समजले जाते.
Thank you Thiruvananthapuram! The mandate the BJP-NDA got in the Thiruvananthapuram Corporation is a watershed moment in Kerala’s politics. The people are certain that the development aspirations of the state can only be addressed by our Party. Our Party will work towards… — Narendra Modi (@narendramodi) December 13, 2025
हा तोच मतदारसंघ आहे जिथे कॉँग्रेसचे नेते शशी थरूर हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे हा भाग बरेच वर्ष कॉँग्रेस आणि डाव्या आघाडीचे वर्चस्वाखाली असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान येथे आता भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे केरळमध्ये भाजपची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान मोदींची पोस्ट काय?
तिरूवअनंतपुरममध्ये भाजपचा विजय झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले, “धन्यवाद तिरूवअनंतपुरम. हा विजय केरळच्या राजकारणातील एक महत्वाचा क्षण आहे. भाजपच केरळच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करू शकते असा तेथील जनतेला विश्वास आहे.” पंतप्रधान मोदी यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले.