
Sunetra Pawar स्वीकारणार उपमुख्यमंत्रीपद, तर 'या' मंत्रालयांची मिळणार जबाबदारी (Photo Credit- X)
केवळ उपमुख्यमंत्रीपदच नाही, तर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य सरकारमधील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी उत्पादन शुल्क आणि क्रीडा ही दोन मंत्रालये देखील सोपवली जाणार आहेत. सत्तेचे संतुलन राखण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) पकड मजबूत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
राजकीय वर्तुळातून दुसरी मोठी बातमी म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः राज्याच्या अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, आर्थिक धोरणांवर थेट नियंत्रण असावे आणि बजेटची तयारी प्रभावीपणे व्हावी, या हेतूने फडणवीसांनी ही महत्त्वाची जबाबदारी घेण्याचे ठरवले आहे.
अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीतील समीकरणे बदलणार? स्थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता
उद्या दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर औपचारिक शिक्कामोर्तब केले जाईल. ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवारांना दिलेली ही जबाबदारी राष्ट्रवादीसाठी ‘धोरणात्मक’ मास्टरस्ट्रोक मानली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नितीन गडकरी आमचे नेते आणि मार्गदर्शक आहे. त्यामुळे ज्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्याशी चर्चा झाली. एक रूपरेषा ठरवण्यात आली आहे. उद्या किंवा परवा नावे अंतिम होणार आहेत. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष घेईल. भाजप आणि सरकार म्हणून ते जो निर्णय घेतील त्या निर्णयामागे आम्ही पाठीशी उभे राहू. अजित पवारांचे कुटुंब आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच्या निर्णयाला आमचे योग्य ते समर्थन असेल. अंतिम निर्णय जो असेल तो त्यांचा पक्ष घेईल.”