
'निवडणुका रद्द करणे पूर्णपणे चुकीचे! (Photo Credit - X)
निवडणुका रद्द करणे चुकीचे आणि कायदेशीर नाही
निवडणुका रद्द करण्याच्या चर्चेवर बोलताना फडणवीस यांनी तीव्र विरोध दर्शवला. “निवडणुका रद्द करणे पूर्णपणे चुकीचे आहे.” “प्रत्येक वेळी कोणी कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पुढे ढकलली जाईल, असे कधीही झालेले नाही.” “मी अनेक वकिलांशी बोललो, अशा निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत.” तसेच, निवडणूक आयोग कुणाचा सल्ला घेत आहे, हे आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजप आणि महायुतीची स्थिती
निवडणुकीच्या निकालांबद्दल बोलताना त्यांनी महायुतीबद्दल मोठा विश्वास व्यक्त केला. “या निवडणुकीत भाजप एक नंबरवर असेल आणि मित्रपक्ष त्या खालोखाल राहणार आहेत.” “महायुतीतील पक्ष ७० ते ७५ टक्के जागांवर निवडून येणार आहेत.”
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद… (छत्रपती संभाजीनगर | १-१२-२०२५)#Maharashtra #NagarParishad2025 #Niti_Gati_Pragati pic.twitter.com/0GiRvlqOm1 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 1, 2025
कार्यकर्त्यांसाठी धावपळ
निवडणूक प्रचाराच्या आपल्या व्यस्त कार्यक्रमाबद्दल ते म्हणाले: “कार्यकर्ते धावपळ करतात. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यासाठी जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
हे देखील वाचा: तिजोरीच्या चाव्यांवरुन रंगलं राजकारण! जोरदार राजकीय वादंगानंतर अजित पवारांचा यु-टर्न
सकारात्मक अजेंडा
विरोधकांच्या टीकेवर बोलणे टाळत फडणवीसांनी आपला सकारात्मक अजेंडा मांडला: “पूर्ण निवडणुकीत मी मित्रांवर सोडा, विरोधकांवर टीका केली नाही. मी कोणाच्या विरोधात बोललो नाही.” “सकारात्मक अजेंडा घेऊन जातो आहे आणि सकारात्मक मत मागत आहे.”
राणे विरुद्ध राणे वादावर आत्मचिंतनाचा सल्ला
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबातील वादावर बोलताना त्यांनी आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला: “जी परिस्थिती बघितली, ती योग्य नाही. राणे विरुद्ध राणे होणं योग्य नाही. निवडणुकीनंतर आत्मचिंतन केलं पाहिजे.” “मी सगळ्यांच्या पाठीशी आहे. जो चांगला वागेल, त्यांच्या पाठीशी मी आहे.”
संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया
संजय राऊत यांच्यावर टिप्पणी करताना त्यांनी सौम्य प्रतिक्रिया दिली: “बरे झाले (ते बरे झाले) याबाबत आनंद आहे. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो.” “राजकारणात कोणीही आमचा शत्रू नाही. राजकीय विरोधक नाही. विरोधक आजारी पडला तर तब्येत बरी झाली पाहिजे.”
कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतून माघार घेणे अयोग्य
विरोधक निवडणुकीतून माघार घेत असल्याच्या चर्चांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. “रक्ताचं पाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत फिरायचं नाही, हे योग्य नाही.” “निवडणुकीतून माघार घेणं योग्य नाही. शेवटी कार्यकर्ते लक्षात ठेवतात की, आमच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही.” “त्यांनाही ही कल्पना आहे की, आपण निवडणुकीत हरणार आहोत. हा शिक्का त्यांना माथी लावायचा नाही.”
शहाजी बापू आणि तपासणी
आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवर बोलताना त्यांनी कायद्याचे समर्थन केले. “आमच्या कार्यकर्त्यांबाबत तक्रार आल्यास, चौकशी केली जाते.” “माझी देखील गाडी तपासली जाते. त्यामुळे सत्ताधारी-विरोधक असं काही नसतं.”