
Chiplun BJP candidate Shubham Pise wins by one vote in Nagarpanchayat Election Result 2025 LIVE updates
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अतिशय स्थानिक राजकीय परिस्थितीवर अबलंबून असतात. यामध्ये अगदी कमी मतांच्या फरकाने देखील उमेदवार निवडून येतात. असाच काहीसा प्रकार चिपळूणमध्ये झाला आहे. चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार होते. 110 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदाचे तीन तर नगरसेवक पदाचे 10 अर्ज बाद झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगरपरिषदेत एकूण 26 प्रभाग आहेत. यात एका प्रभागातून शुभम पिसे हे अवघ्या 1 मताने विजयी झाले आहेत.
हे देखील वाचा : बीडमध्ये मुंडे गढ राखणार की सोनावणे बाजी मारणार? मुंडे भावा-बहिणीची प्रतिष्ठा पणाला
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात होते. तर नगरसेवकपदासाठीच्या २८ जागांसाठी तब्बल ११० उमेदवार रिंगणात होते. चिपळूणची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्याप्रमाणे शुभम पिसे यांचा केवळ एका मताने विजय झाला आहे. यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले. विजयानंतर शुभम पिसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “शेवटी विजय तो विजय असतो. एक मताने काय आणि शंभर मतांनी काय. मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास मी सार्थ ठरवेन”, असे भाजपचे संदीप भिसे यांनी विजयानंतर बोलताना सांगितले.
हे देखील वाचा : छगन भुजबळांची जादू आजही कायम! रुग्णालयात असूनही खेचून आणला विजयश्री
पुण्यामध्ये देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. पुण्यातील वडगाव मावळमध्ये देखील एका मताने उमेदवार निवडून आला आहे. वडगाव मावळमध्ये अजित पवार यांच्या उमेदवाराने एका मताने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे या निवडून आल्या आहेत. त्या नगरसेवक पदाच्या उमेदवार होत्या. अवघ्या एका मताने त्यांनी निवडणूक जिंकली आहे. सुनीता ढोरे या प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांना एकूण ३२३ मतं मिळाली. त्यांनी भाजपच्या पूजा अतिश ढोरे यांना एक मताने हरवलं आहे.