Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Politics: निष्ठावंतांपासून, ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच नाराज; मग भाजपमध्ये आनंदी तरी कोण?

महापालिकेत सत्तेच्या सोपानावर विराजमान होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्वच पर्याय वापरले. महापालिकेतील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी गिरीश महाजन यांनी ऐनवेळी आयारामांना पक्षात घेतले,

  • By anuradha sagar
Updated On: Feb 05, 2026 | 03:41 PM
Nashik Politics

Nashik Politics

Follow Us
Follow Us:
  • शहर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू
  • पक्षप्रवेशामुळे तिघा आमदारांची नेत्यांवर नाराजी
  • महापालिकेत सत्तेच्या सोपानावर विराजमान होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्वच पर्याय वापरले
Nashik Politics: महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासूनच शहर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू
झाले. या वादाने पक्षप्रवेशाच्यावेळी परिसीमा गाठली. परिणामी पक्षाच्या निष्ठावंतांनी तसेच विद्यमान आमदारांनीच भाजपा कार्यालयाबाहेर या पक्षप्रवेशाला जाहीर विरोध केला. आयारामांमुळे निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त करून आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का? असा सवाल उपस्थित करून मंत्री गिरीश महाजनांना घेरावही घातला होता.

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान

जुन्या, ज्येष्ठ आणि निष्ठावंतांना पक्षाच्या कोणत्याही निर्णयात विचारात घेतले जात नसल्याने वेळोवेळी ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती. आता महानगरअध्यक्ष सुनील केदार यांनी महापौर, उपमहापौर निवडीत आपल्याला विचारात घेतले नाही म्हणून राजीनामा दिला. त्यांनी तो २४ तासाच्या आत मागेही घेतला, हा भाग वेगळा. पण जर पक्षात तिन्ही आमदार, निष्ठावंत कार्यकर्ते, महानगर अध्यक्ष, ज्येष्ठ नेते हे सर्वच नाराज आहेत तर मग पक्षात आनंदी तरी कोण? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

पक्षप्रवेशामुळे तिघा आमदारांची नेत्यांवर नाराजी

महापालिकेत सत्तेच्या सोपानावर विराजमान होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्वच पर्याय वापरले. महापालिकेतील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी गिरीश महाजन यांनी ऐनवेळी आयारामांना पक्षात घेतले, मात्र या निर्णयाचा फटका विद्यमान लोकप्रतिनिधींना बसू शकतो. याचा वरिष्ठ पातळीवर विचारच झाला नाही. महाजनांनी नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, नाशिक मध्य या तिन्ही मतदारसंघातून विद्यमान आमदारांच्या विरोधात निवडणूक लढलेले आणि भाजपावर अत्यंत खालच्या शब्दांत टीका करणाऱ्यांना पक्षात सामावून घेतले. याला तिन्ही आमदारांनी आपापल्या परीने विरोधही केला होता. मात्र तरीही महाजनांनी आमदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून आपला अजेंडा राबवला, महापौर, उपमहापौर निवडीच्यावेळीसुद्धा महाजनानी जाहीर केलेली उमेदवारी अनेक नगरसेवकांना तसेच आमदारांना धक्का देणारी ठरली. मच्छिंद्र सानप यांच्या निवडीमुळे आमदार राहुल ढिकले यांना शह देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. आ. फरांदे यांनी सुचविलेल्या नावांकडेसुद्धा महाजनांनी दुर्लक्ष केले.

Maharashtra Politics: शिवसेनेची ताकद वाढणार; माजी आमदारासह आख्खा पक्ष शिवसेनेत विलीन होणार

तक्रार तरी कुणाकडे करायची?

नाशिकची जबाबदारी घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी एककल्ली कारभार सुरू केल्याचा आरोप त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिका-यांनी वेळोवेळी केला, याप्रश्नी पक्षाचे तिन्ही आमदार मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांना देखील भेटले होते. मात्र तरीही काही उपयोग झाला नाही, त्यामुळे आता तक्रार तरी करायची कुणाकडे? म्हणून तिन्ही आमदारांनी शांततेचा मार्ग स्वीकारला आणि जे जे होईल, ते ते पहावे या भूमिकेत ते पोहोचले, भाजपासाठी ज्यांनी ३५-४० वर्षे आपले जीवन खर्ची घातले त्यांनादेखील बाजूला सारण्यात आले. त्यामुळे तेही महाजनांवर नाराज आहेत. महानगरप्रमुखही आता विश्वासात घेतले जात नाही, म्हणून नाराज झाले अन् त्यांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

राज्यातील नेत्यांचे मंत्री महाजनांना पाठबळ

भाजपासारख्या शिस्तप्रिय आणि सुसंस्कारीत म्हणून ओळख मिरवणा-या पक्षात ज्येष्ठ नेते, निष्ठावंत कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, आमदार, महानगरअध्यक्ष है कुणीच महाजनांच्या कामकाजावर खूष नाहीत तर मग शहर भाजपात नक्की खुश तरी कोण आहे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जर कुणीच खूष नाही तर मग राज्य स्तरावरील नेत्यांना याची जाणीच नाही का? की तेथून मिळणाऱ्या पाठबळामुळेच महाजन आपलाच निर्णय या सर्वांवर थोपवत आहेत. या प्रश्नांची उत्तरे वेळेत मिळाली नाहीत तर महापालिकेत सत्ता एकहाती असली तरी महापौरांना काम करणे कठीण होणार आहे.

Web Title: Nashik politics from loyalists to senior leaders and party workers everyone is unhappy so who exactly is happy in the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • Nashik Politics

संबंधित बातम्या

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड
1

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड

Navnath Waghmare News: ओबीसींची मुले अन् पैसा पाहून मराठा तरुणी त्यांच्या घरात घुसतात; नवनाथ वाघमारेंचे वादग्रस्त विधान
2

Navnath Waghmare News: ओबीसींची मुले अन् पैसा पाहून मराठा तरुणी त्यांच्या घरात घुसतात; नवनाथ वाघमारेंचे वादग्रस्त विधान

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
4

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.