Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्योती पाटील मजबूत उमेदवार असल्याचे मुख्यमंत्र्यांनाही मान्य; भाजपच्या स्थानिक नेत्यांची बंडाळी?

मी भाजपचा समर्पित कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. तासगावात राष्ट्रवादीसोबतच युती करावी, ज्योती पाटील बलवान उमेदवार आहेत, याची माहिती मी वरिष्ठ नेतृत्त्वाला दिली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 28, 2025 | 02:59 PM
देवेंद्र फडणवीसांचे निर्देश पायदळी; तासगावात संदीप गिड्डेंचा स्फोटक आरोप

देवेंद्र फडणवीसांचे निर्देश पायदळी; तासगावात संदीप गिड्डेंचा स्फोटक आरोप

Follow Us
Close
Follow Us:

तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत महायुती करावी, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र, हे निर्देश धाब्यावर बसवत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र पॅनेल टाकल्याचा गंभीर आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्ढे यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योती पाटील यांना ‘मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील’ असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

गिड्ढे म्हणाले, “मी भाजपचा समर्पित कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. तासगावात राष्ट्रवादीसोबतच युती करावी, ज्योती पाटील बलवान उमेदवार आहेत, याची माहिती मी वरिष्ठ नेतृत्त्वाला दिली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनीही ज्योती पाटील यांच्या उमेदवारीला होकार दिला होता. तरीही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना अंधारात ठेवत स्वतंत्र पॅनेल लावले.”

हेदेखील वाचा : NCP Politics: तिजोरीच्या चाव्यांवरून नव्या वादाची ठिणगी; लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेलांचा पुनरूच्चार

ते पुढे म्हणाले, “मला नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेतून दूर ठेवले गेले. शहर-ग्रामीण संघटनांमध्ये समन्वय नाही. वरिष्ठांकडून आलेल्या सूचना माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत.”

कुरुक्षेत्रातील अर्जुनासारखी अवस्था

तासगाव निवडणुकीत माझी अवस्था कुरुक्षेत्रातील अर्जुनासारखी झाली आहे, अशी बोचरी टिप्पणी करत गिड्ढे म्हणाले, “माझ्या शिलेदारांना विविध पक्षातून उभे केले आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार. ज्योती पाटील यांच्या प्रचारात मी सक्रिय राहणार.”

स्वप्नील पाटील म्हणजे ‘अभिजीत बिचुकले’; नाव न घेता टीका

भाजपच्या स्वतंत्र पॅनेलबाबत विचारले असता गिड्ढे म्हणाले, “पॅनेल कोणीही लावू शकतो. साताऱ्यात उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले पॅनेल लावतात. त्यात काही नवीन नाही.” यामधून त्यांनी स्वप्नील पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.

माझ्यावर कुरघोड्या तर उत्तरही कठोर

“कोणी माझ्या राजकीय अस्तित्वाला धक्का देण्याचा प्रयत्न केला तर मी स्वस्थ बसणार नाही. आजवर उपयुक्त मूल्य दाखवले; पण आता उपद्रव मूल्य दाखवण्याची वेळ आली आहे.” असे ते म्हणाले. तासगावातील भाजप अंतर्गत संघर्ष उफाळून येत असताना गिड्ढे यांच्या आरोपांमुळे नगरपालिका निवडणुकीत नवे समीकरण आकाराला येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राज्यात महायुतीला मोठा धक्का; कोकणातील ‘या’ भागात दिसून आले नवे समीकरण

Web Title: Cm devendra fadnavis also agrees that jyoti patil is a strong candidate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • sangli news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : प्रचाराला उरले फक्त चार दिवस; मतदारयाद्या तपासणीला आला आता वेग
1

Maharashtra Politics : प्रचाराला उरले फक्त चार दिवस; मतदारयाद्या तपासणीला आला आता वेग

Maharashtra Politics: राज्य सरकारचा मोठा निर्णय; आधार वापरून दिले जाणारे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश, मार्गदर्शक तत्वे
2

Maharashtra Politics: राज्य सरकारचा मोठा निर्णय; आधार वापरून दिले जाणारे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश, मार्गदर्शक तत्वे

तासगाव शहर भयमुक्त व दहशतमुक्त करण्याचा आमचा संकल्प : ज्योती पाटील
3

तासगाव शहर भयमुक्त व दहशतमुक्त करण्याचा आमचा संकल्प : ज्योती पाटील

Solapur News : बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम; जिल्हाधिकार्‍यांच्या ‘त्या’ निर्णयाला निवडणूक आयोगाची स्थगिती
4

Solapur News : बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम; जिल्हाधिकार्‍यांच्या ‘त्या’ निर्णयाला निवडणूक आयोगाची स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.