Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

एकीकडे फडणवीस आणि शिंदे हे राज्यभर दौरे करून प्रचाराचा धडाका लावत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वपक्षाच्या आढावा बैठका आणि संघटनात्मक नियोजनात व्यस्त असल्याची माहिती आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 19, 2025 | 01:02 PM
आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीही केली जात आहे. असे असताना आता राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचाराला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारपासून विविध ठिकाणी जोरदार प्रचारात सहभागी झाले होते. एकाच दिवशी राज्याच्या विविध भागांत सभा, रोड शो आणि जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारचा कार्यक्रम पूर्णपणे निवडणूक प्रचारावर केंद्रित होता. सकाळी १०.५० वाजता सातारा जिल्ह्यातील फलटण येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगरपरिषद निवडणूक प्रचारसभा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. त्यानंतर दुपारी १२.४० वाजता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे वीर सावरकर मैदान, बाजारतळ येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. दुपारी २.५५ वाजता नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे जि. प. मुलींच्या हायस्कूलच्या परिसरात मुख्यमंत्र्यांनी मतदारांशी संवाद साधला. सायंकाळी ५ वाजता वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आठवडी बाजार चौक, नगरपरिषद समोर प्रचारसभेद्वारे मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराची सांगता केली.

दरम्यान, सायंकाळी पाच वाजता ठाणे जिल्ह्यातील कल्याण (पूर्व) येथे कै. दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आणि त्यात सचिन पोटे यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. सायंकाळी ७ वाजता अंबरनाथ (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपमुख्यमंत्री शिंदे यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती.

सकाळी शिंदेंचा अमरावतीत प्रचारदौरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही गुरुवारचा दिवस प्रचार आणि संघटनात्मक हालचालींनी भरलेला होता. सकाळी ११.३० वाजता अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे द्वारका चौक ते संत रुपलाल महाराज मंदिर दरम्यान रोड शोमध्ये एकनाथ शिंदे सहभागी झाले. या रोड शोद्वारे शहरातील मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

समन्वयाने प्रचार केला सुरू

एकीकडे फडणवीस आणि शिंदे हे राज्यभर दौरे करून प्रचाराचा धडाका लावत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वपक्षाच्या आढावा बैठका आणि संघटनात्मक नियोजनात व्यस्त असल्याची माहिती आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी महायुतीकडून समन्वयाने प्रचार सुरू असून येत्या काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

हेदेखील वाचा : BMC Election 2026: मुंबई महापालिकेत ‘धनुष्यबाण’ हाती घेण्यासाठी चढाओढ! २२७ जागांसाठी २७०० हून अधिक महिलांची विक्रमी उपस्थिती

Web Title: Cm devendra fadnavis and dcm eknath shinde launch a vigorous campaign for the upcoming municipal elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

रविंद्र धंगेकरांची ‘ती’ भूमिका भाजपला खटकली? पुण्यात भाजप-शिवसेनेच्या बैठकीला बोलावलंच नाही
1

रविंद्र धंगेकरांची ‘ती’ भूमिका भाजपला खटकली? पुण्यात भाजप-शिवसेनेच्या बैठकीला बोलावलंच नाही

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे धोरण ठरले ! आता लक्ष दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे
2

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे धोरण ठरले ! आता लक्ष दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक
3

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

‘मत संग्राम’ मनपाचा! नांदेड प्रशासन सज्ज; ८१ नगरसेवक रिंगणात, ५ लाख मतदार ठरवणार भविष्य
4

‘मत संग्राम’ मनपाचा! नांदेड प्रशासन सज्ज; ८१ नगरसेवक रिंगणात, ५ लाख मतदार ठरवणार भविष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.