मुंबई महापालिकेत 'धनुष्यबाण' हाती घेण्यासाठी चढाओढ! (Photo Credit - X)
‘रंगशारदा’ येथे रंगला मुलाखतींचा सोहळा
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात लोकसभानिहाय मतदारसंघानुसार या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी पक्षाकडून तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.
माननीय उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने वांद्रे येथील रंगशारदा येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपूर्ण 227 प्रभागांमधून 2400 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीत सहभाग नोंदवला. यानंतर कार्यक्रमाची… pic.twitter.com/ntiesPjFyP — Rahul Shewale – राहुल शेवाळे (@shewale_rahul) December 18, 2025
हे देखील वाचा: Shivsena News: भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश
इतरांच्या तुलनेत शिवसेनेला मोठा प्रतिसाद
राहुल शेवाळे म्हणाले की, “मुंबईत सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, मात्र शिवसेनेला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. विशेष म्हणजे, केवळ शिवसेनेचेच कार्यकर्ते नाही, तर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी मुलाखती दिल्या आहेत.”
विजयाचा विश्वास: ‘शिंदे पॅटर्न’ची जादू
इच्छुकांच्या या विक्रमी गर्दीचे मुख्य कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि संपूर्ण राज्यात केलेल्या कामांमुळे जनतेत सकारात्मक वातावरण आहे. शिंदेंच्या प्रभावामुळे कार्यकर्त्यांना विजयाचा मोठा विश्वास आहे, म्हणूनच उमेदवारीसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. शिवसेना ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहे, तरीही सक्षम उमेदवार निवडण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात आली.






