Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis Live : देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रिपद; मित्रपक्षांनी संमती दिली तर…

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन विकासकामांचा आराखडा व लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी पालकमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 25, 2024 | 02:32 PM
“मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही.”, मनोज जरांगेंच्या टीकेला CM फडणवीसांचं प्रत्युत्तर

“मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही.”, मनोज जरांगेंच्या टीकेला CM फडणवीसांचं प्रत्युत्तर

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. महायुतीमध्ये सत्तास्थापन, मंत्रिमंडळ वाटप आणि विस्तार अशा सर्वच मुद्द्यांवर जोरदार राजकारण रंगले. महायुतीमध्ये तिन्ही पक्षातील अनेक जेष्ठ नेते नाराज आहेत. मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, दीपक केसरकर असे अनेक नेते नाराज आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या एका आठवड्यानंतर खातेवाटप करण्यात आले. त्यानंतर आता सर्व नेत्यांना पालकमंत्रिपदाच्या वाटपाची प्रतिक्षा लागली आहे. अनेक नेत्यांनी याबाबत इच्छा व्यक्त केलेली असताना याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे.

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील पाच वर्षांसाठी त्यांच्या डोक्यामध्ये असलेल्या विकासकामांचा आराखडा एकप्रकारे सादर केला. तसेच विदर्भातील सिंचन प्रकल्प व नदीजोड प्रकल्प याबद्दल देखील देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर मत मांडले आहे. यावेळी त्यांना पालकमंत्रिपदाच्या वाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री हवे असल्याचा प्रश्न देखील विचारण्यात आला.

महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

देवेंद्र फडणवीस पालकमंत्रिपदाबाबत बोलताना यांचा निर्णय त्यांच्या युतीमधील इतर नेते घेणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘”पालकमंत्र्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे आणि दोन उपमुख्यमंत्री ठरवतील. मला बीडला पाठवलं तर मी जाईल. खरंतर मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेत नसतात. पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी माझी इच्छा आहे. अर्थात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तरच घेईन,” अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “गडचिरोलीचा विकास होत आहे. नक्षलवाद कमी होत आहे. ज्या भागात आपण जात नव्हतो त्या भागांमध्ये आता खोलवर जाता येत आहे. निकरची लढाई होण्याची शक्यता आहे. यामधून आपण गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचे काम आपण करणार आहोत. महाराष्ट्राच्या समोर सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे. यावर आळा घालण्याचा प्रयत्न असणार आहे. सर्व आवास योजनांमध्ये मिळणाऱ्या घरांना सोलार दिले जाणार आहे. विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न असणार आहे.जनतेने दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मागील काही दिवसांपासून बीड व परभणी प्रकरण जोरदार चर्चेत आहे. बीडमध्ये केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे फक्त बीड नाही तर राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. बीडमध्ये गॅंग ऑफ वासेपूर सुरु असल्याची टीका भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्यामुळे बीडमध्ये वचक बसवण्यासाठी स्वतः गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपद घ्यावे अशी मागणी केली जात होती. त्यामुळे बीडमध्ये मुंडे परिवारातील पालकमंत्री होणार की मुख्यमंत्री स्वतःच्या ताब्यात हा जिल्हा घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. या पालकमंत्रिपदासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

Web Title: Cm devendra fadnavis expressed desire to become the guardian minister of gadchiroli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 02:31 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

लाडक्या बहिणींसोबत ‘देवाभाऊ’ची सेल्फी! “एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’…”; काय म्हणाले CM देवेंद्र फडणवीस?
1

लाडक्या बहिणींसोबत ‘देवाभाऊ’ची सेल्फी! “एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’…”; काय म्हणाले CM देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन
2

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

Satara News: मतचोरीचे वादळ महाराष्ट्रापर्यंत; मतदार याद्यांमधील बोगस नावांवरून सातऱ्यात काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप
3

Satara News: मतचोरीचे वादळ महाराष्ट्रापर्यंत; मतदार याद्यांमधील बोगस नावांवरून सातऱ्यात काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra 1st Conclave : महाराष्ट्र ‘ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ बनू शकेल का? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लॅन? वाचा सविस्तर
4

Maharashtra 1st Conclave : महाराष्ट्र ‘ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ बनू शकेल का? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लॅन? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.