CM Devendra fadnavis live news on Mira Bhayandar MNS Morcha Mumbai news update
मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद आता पेटला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे या वादामध्ये ठिणगी प़डली. प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्ती करण्यावरुन या वादाला सुरुवात झाली होती. आता मात्र मनसेने रस्त्यावर उतरुन मोर्चा केला आहे. यामुळे वातावरण चिघळले असून मीरा भाईंदर परिसरामध्ये जमावबंदी सुरु झाली आहे. मनसे आंदोलकांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरु केली आहे. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांची अस्मिता दुखावेल अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. मराठी माणसांनी महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवावं. उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये आलात तर उचलून आपटून आपटून मारु. तुम्ही आमच्या भाकरीवर जगता, अशा स्वरुपाचे वादग्रस्त विधानं केली होती. यानंतर आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने मीरा भाईंदर येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी न दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी आयुक्तांना विचारलं आहे की मोर्चाला परवानगी का दिली नाही. कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण देतो. मला आयुक्तांनी सांगितलं की त्यांच्याशी मोर्चाच्या मार्गासंदर्भात चर्चा सुरु होती. मात्र ते जाणीवपूर्णक असा मार्ग मागत होते ज्यामुळे संघर्ष होईल. आणि पोलिसांचे असे देखील म्हणणे होते की काही लोकांच्या संदर्भात वेगळी कारवाई करायची आहे अशी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं की जो नेहमी मोर्चाचा मार्ग असतो तो घ्या,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “पोलिसांनी मार्ग बदलायला सांगितल्यानंतर देखील त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही हाच मार्ग घेणार. दुसऱ्या मार्गावर आम्ही जाणार नाही असे मनसेने मत व्यक्त केल्याने आम्ही ती परवानगी नाकारली. तथापि, जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर परवानगी मिळेल. मात्र आम्हाला येथे काढायचा आणि असाच काढायचा असे ठरवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही. शेवटी आपल्या सर्वांना एकत्रितपणे एकाच राज्यामध्ये राहायचं आहे,” अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.