
CM Devendra Fadnavis meet MP Sanjay Raut late night 20 minutes of discussion
Raut-Fadnavis Meet : मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Local Body Elections) राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काल (दि. 02 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर निकाल पुढे ढकलण्यात आले आहेत. यानंतर आता राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली आहे. काल (दि.02) रात्री उशीरा दोन्ही नेत्यांची भेट झाली. एका खाजगी कार्यालयामध्ये झालेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आले. मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार राऊत यांच्यामध्ये 20 मिनीटे चर्चा झाली. या भेटीमागचे कारण समोर आलेले नाही. मात्र निवडणूक प्रक्रियेमध्ये झालेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आले.
हे देखील वाचा : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!
मागील काही दिवसांपासून खासदार संजय राऊत यांची प्रकृती खालावली आहे. वैयक्तिक कारणांमुळे आणि आजारपणांमुळे संजय राऊत हे सार्वजनिक जीवनातून ब्रेक घेतला. संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया देखील पार पडली. यानंतर संजय राऊत हे आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी ही भेट घेतल्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या चौकशीासाठी ही भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा :नेहरुंना सरकारी पैशातून बाबरी मशीद बांधायची होती; राजनाथ सिंह यांचा खळबळजनक आरोप, वाद पेटणार?
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. खासदार संजय राऊत म्हणाले की. देवेंद्र फडणवीस हे आमचे कधी काळी जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती जपतो. आम्ही एकत्र काम केले आहे. आजारपणात त्यांनी स्वत: फोन करुन चौकशी केली. त्यासोबतच सर्व प्रकारची मदतही केली. राजकारण वेगळं आहे. व्यक्तिगत नाती वेगळी आहेत. केंद्रातील जवळपास सर्वच मंत्र्यांनी फोन करत माझी चौकशी केली. राजकारणात किती शत्रू असले तरी ते व्यक्तिगत स्तरावर शत्रूत्व येता कामा नये. देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांनीही माझी चौकशी केली. मोदी वारंवार चौकशी करत असतात. राज ठाकरे, उद्धव ठाकरेही सतत चौकशी करत असतात, असे संजय राऊत म्हणाले होते. तर संजय राऊत बरे झाले याचे समाधान देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केले होते. यानंतर आता दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.