Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: बेपत्ता महिलांचा शोध; आता पोलीस ठाण्यांचे रँकिंग ‘शोधमोहिमे’वर ठरणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पर्यंत, जुलै २०१५ पासून आतापर्यंत या मोहिमेच्या १३ टप्प्यांमध्ये ४१,००० हून अधिक मुलांची सुटका करण्यात आली आहे

  • By anuradha sagar
Updated On: Mar 05, 2026 | 10:14 AM
Devendra Fadnavis, Ladki Bahin Yojana, Maharashtra Govt,

Devendra Fadnavis, Ladki Bahin Yojana, Maharashtra Govt,

Follow Us
Follow Us:
  • बेपत्ता महिला आणि मुलांच्या शोधमोहिमेत पोलीस ठाण्यांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन
  • अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या (ADG) अध्यक्षतेखाली दरमहा या प्रकरणांचा आढावा घेतला
  • अनेकदा जुन्या प्रकरणांमध्ये कुटुंबीय किंवा पोलिसांचा पाठपुरावा कमी होतो
Nashik News: राज्यात मुली आणि महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शोधमोहीमेच्या कामगिरीवरून संबंधित पोलिस ठाण्यांचे नामांकन ठरविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी अल्पवयीन मुले, मुली आणि महिलांच्या बेपत्ता प्रकरणांचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणांमध्ये शासनाने कोणती ठोस पावले उचलली आहेत, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली.

उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, सन २०२४ मध्ये राज्यात ४५,६६२ महिला आणि ११.३१६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. तर २०२५ मध्ये ४८, २७८ महिला आणि १२,११३ मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २०२५ मध्ये २.६१६ महिला आणि ७९७ मुली अधिक बेपत्ता झाल्याची कबुली त्यांनी दिली.

Kolhapur Heat: महाराष्ट्र होरपळला! कोल्हापुरात पारा ३४.९ अंशांवर, तर विदर्भात ‘हीट वेव्ह’चा इशारा

आता बेपत्ता मुली आणि महिलांच्या शोधासाठी विशेष पथके संबंधित पोलिस अधिकारी व पोलिस ठाण्यांचे नामांकन निश्चित केले जाईल,
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दरमहा विशेष आढावा बैठक होणार

वर्ष उलटल्यानंतर काही प्रकरणांत कुटुंबीय तसेच पोलिसांचा पाठपुरावा कमी होतो, ही बाब चिंताजनक असल्याचे फडणवीस म्हणाले. या पार्श्वभूमीवर दरमहा अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक घेतली जाते. महिला पोलिस अधिकाऱ्यांमार्फत प्रकरणांचा तपशीलवार आढावा घेतला जातो. (Maharashtra Police) 

४१ हजार मुलांना शोधण्यात यश

‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत आतापर्यंत ४१, १९३ लहान मुले आणि मुलींना शोधण्यात यश मिळाले आहे. बेपत्ता महिलांपैकी सुमारे ५५ ते ६० टक्के महिला पहिल्या वर्षात सापडतात, तर अडीच ते तीन वर्षांत हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचते. महिलांच्या शोधदरात सध्या १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात बेपत्ता मुले आणि महिलांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमांना आता तंत्रज्ञानाची मोठी साथ मिळत आहे. केवळ मानवी तपासावर अवलंबून न राहता, पोलीस आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि प्रगत डेटाबेचा वापर करत आहेत.

Cheese Doodle Day: जिभेवर विरघळणारं चीज अन् कुरकुरीत मका, लहानपणच्या ‘त्या’ चवीची आठवण

 

ऑपरेशन मुस्कान: यशाचा आलेख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पर्यंत, जुलै २०१५ पासून आतापर्यंत या मोहिमेच्या १३ टप्प्यांमध्ये ४१,००० हून अधिक मुलांची सुटका करण्यात आली आहे. सध्या राज्यात या मोहिमेचा १४ वा टप्पा (२० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६) राबवण्यात आला, ज्यामध्ये केवळ एका महिन्यात १,४०१ मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा मिळवून देण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांत पोलिसांनी एकूण ८६,२२८ महिला आणि मुलींचा यशस्वीपणे शोध घेतला आहे. यामध्ये मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी सर्वाधिक कामगिरी केली आहे.

 

मानवी तस्करी रोखण्यासाठी नवीन तांत्रिक प्रणाली

सरकारने मानवी तस्करी आणि बेपत्ता प्रकरणांसाठी काही अत्यंत आधुनिक ‘स्मार्ट’ तंत्रज्ञान प्रणाली कार्यान्वित केल्या आहेत. नागपूर पोलिसांनी महाराष्ट्रात प्रथमच ‘गरुड दृष्टी’ आणि AI-आधारित चेहरा ओळखणारी चेहरा ओळखण्याची प्रणाली (Facial Recognition System – FRS) यंत्रणा कार्यान्वित केली आहे. बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी ८ हून अधिक हाय-टेक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये बेपत्ता व्यक्ती आणि संशयित मानवी तस्करांचा डेटा फीड केलेला असतो. संशयित दिसताच हे कॅमेरे तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) अलर्ट पाठवतात.

 

 

Web Title: Search for missing women now the ranking of police stations will be based on search campaigns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Police
  • Missing Case

संबंधित बातम्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजासाठी आठ नव्या योजना, ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळणार
1

राज्य सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजासाठी आठ नव्या योजना, ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळणार

Maharashtra Politics: ‘काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे…’; ‘त्या’ प्रकरणात रोहित पवार आक्रमक
2

Maharashtra Politics: ‘काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे…’; ‘त्या’ प्रकरणात रोहित पवार आक्रमक

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ जुलैला धावणार!
3

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ जुलैला धावणार!

मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी राज्य सरकारकडून मान्य, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर
4

मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी राज्य सरकारकडून मान्य, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.