सर्व शाळांमध्ये १४ पासून पसायदान केले अनिवार्य
Devendra Fadnavis Marathi News : नागपूर : मालेगावमधील भिक्कू चौक येथे बॉम्बस्फोट झाला होता. 29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला. हा स्फोट नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल हाती आला आहे. यामधील सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. यावरुन भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे जे 2008 चे रचलेले षडयंत्र आहे हे सगळ्यांसमोर उघडे पडले आहे. तत्कालीन सरकारने मतांच्या राजकारणासाठी हिंदू दहशतवाद आणि भगवा आतंकवाद हे शब्द तयार केले. संपूर्ण जगामध्ये दहशतवादी घटनांचे प्रमाण वाढले होते त्यावेळी एकप्रकारे इस्लामी दहशतवाद हा चर्चेचा विषय होता. अमेरिका, युरोपमध्ये दहशतवादाच्या घटना घडल्या. भारतात तर घडतच होत्या. यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते. त्यातून इस्लामिक टेररिजमच नरेटिव तयार झालं. ते भारताने तयार केलं नव्हतं” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “भारतात या नरेटिवचा आपल्या मतदार आणि वोटबँकेवर परिणाम होतोय हे तत्कालीन सरकार असलेल्या काँग्रेसच्या लक्षात आलं. कोणीच सर्व मुस्लिमांना दहशतवादी ठरवलं नव्हतं. पण तरीदेखील या ठिकाणी सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं यूपीएने षडयंत्र रचलं. हिंदू दहशतवाद हा शब्द तयार केला. याची पूर्ण थेरी तयार करण्यात आली. अनेक लोकांना अटक करण्यात आली. हिंदूत्ववादी आणि आरएसएसचे पदाधिकारी यांना टार्गेट करण्याचे हे षडयंत्र होते. मात्र अनेक प्रयत्न करुन देखील त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना गोवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा मोठा गौप्यस्फोट माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यावेळी असे अनेक अधिकारी होते ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेशन देण्यात आले होते. मात्र या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये देखील इतक्या चुकीच्या पद्धतीचे काम आम्ही करणार नाही अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. लांब लांब पर्यंत त्यांच्याविरोधात कोणतेही पूरावे नव्हते. आता हे षडयंत्र समोर येत आहे. यानंतर देखील अनेक प्रकरणं समोर येतील. लोक हळू हळू बोलू लागतील. त्यावेळी इस्लामिक दहशतवाद होता, आजही आहे. पण असं कोणी म्हटलं नव्हतं की, सर्व मुस्लिम दहशतवादी आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अनेक गंभीर गोष्टी बाहेर येतील असा देखील दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.