
CM Devendra Fadnavis on Uddhav Thackeray And Raj Thackeray bmc election 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच अनेक प्रभागांमध्ये बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये जास्त भाजपचे असल्यामुळे टीका केली जात आहे. याबाबत फडणवीस म्हणाले की, “फक्त आमचे आले हे म्हणणं चुकीचं आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही आला. अपक्षाची काय ताकद असते. पण तोही आला ना. किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवार नाही दिला,. उबाठाने नाही दिला. शरद पवारांनी नाही दिला. अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले. याचं उदाहरण कल्याण डोंबिवली आहे. कल्याण डोंबिवलीत आमचे मागच्यावेळी १०५ निवडून आले. आमची शक्ती वाढली. त्यांच्याकडे नेतेच राहिले नाहीत,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध ‘दलिंदर आणि बिलंदर’ जोडी’, ज्योती वाघमारे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या युतीवर देखील फडणवीसांनी भाष्य केले. राज ठाकरेंसोबत युती का केली नाही असा प्रश्न विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की, “आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्यासोबत स्पेस नाही. जेव्हा आले तेव्हा हिंदुत्व घेतलं होतं. आता त्यांनी हिंदुत्व सोडून दिलं. त्यांनी जुनीच भूमिका घेतली. त्यांनी मराठी माणसाबद्दल बोलले तर हरकत नाही. पण रिक्षावाल्यांना मार, टॅक्सीवाल्यांना मार हे काही आम्हाला जमणार नाही. त्यांचं आणि आमचं जमलं नाही. ते काही आमचे शत्रू नाही. ते पुढेही मित्रच राहतील. पण या निवडणुकीत त्यांची आणि आमची वैचारिक लढाई आहे. मी मित्र म्हणून नाही राजकीय निरीक्षक म्हणून सांगतो. सर्वात मोठं नुकसान राज ठाकरेंना होईल.” अशी राजकीय भविष्यवाणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
हे देखील वाचा : “ही सगळी लाचार माकडं!” उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला; जाणून घ्या भाषणातील ठळक मुद्दे
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वनसाईड झाली. दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं. अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही. जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत आणून उभे करायचे का. भारताच्या लोकसभेत ३५ खासदार बिनविरोध गेले. त्यातील ३२ काँग्रेसच्या काळात गेले. पहिल्या तीन निवडणुकीचं सोडून द्या. आताचं आहे. मागच्या निवडणुकीत गेले. लोकसभेत बिनविरोध जाऊ शकतात. तर महापालिकेत का जाऊ शकत नाही. मुंबई नाशिकच्या बाहेर हे प्रचाराला गेले सांगा. दीड दोन वर्षात कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं. आपण हरलो तर ब्रँड राहणार नाही. म्हणून घराबाहेर पडले नाही. दोघे एकत्र आले तर कोणता तीर मारला,” असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावला आहे.