
ममता सरकार कोसळणार? 'या' बड्या नेत्याने व्यक्त केली भीती; पश्चिम बंगालसाठी आरपारची लढाई
2026 या नवीन वर्षात पश्चिम बंगालमध्ये होणार विधानसभा निवडणूक
अमित शहा स्वतः विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व करण्याची शक्यता
ममता बॅनर्जी यांच्या आरोपांमुळे राजकारण तापले
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणीत एनडीएने घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यानंतर येत्या नवीन वर्षात देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालची निवडणूक भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी महत्वाची समजली जात आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर (SIR) प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. यावरूनच आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर आरोप केला आहे. एसआयआर होऊ दिले नसते तर भाजपने माझे सरकार पाडले असते असा आरोप केला आहे.
पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी अमित शहा स्वतः मैदानात उतरणार असल्याचे समोर येत आहे. यंदा काहीही करून बंगालची निवडणूक जिंकयाची असा भाजपचा निर्धार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आता ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
पश्चिम बंगालमध्ये वादग्रस्त एसआयआर प्रक्रिया होऊ दिली नसती तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपने पश्चिम बंगालमधील सरकार पाडले असते. एसआयआर पासून घाबरण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच त्यांनी स्वतःला नागरिकांचा रक्षक असे संबोधले आहे. दरम्यान या आरोपांवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
बंगाल जिंकण्यासाठी स्वतः ‘चाणक्य’ मैदानात उतरणार
भाजपने सर्व निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याचे समजते आहे. मात्र यंदा भाजप पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार यात शंका नाही. या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी अमित शहा स्वतः मैदानात उतरणार असल्याचे समजते आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून अमित शहा यांना ओळखले जाते. त्यामुळे पश्चिम बंगालची निवडणूक यावेळेस ममता बॅनर्जी यांच्यासाठी देखील सोपी नसणार आहे असे दिसून येत आहे.
ममतादीदींचे टेंशन वाढले! बंगाल जिंकण्यासाठी स्वतः ‘चाणक्य’ मैदानात उतरणार; ‘या’ मास्टर प्लॅनमुळे…
पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी अमित शहा स्वतः मैदानात उतरणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस अमित शहा स्वतः पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला सुरुवात करण्याची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि पोंन्डीचेरी मध्ये महिन्यातील कमीत कमी दोन ते तीन दिवस निवडणुकीसाठी देणार असल्याचे म्हटले जात आहे. अमित शहा यांनी पाचही निवडणुका जिंकण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केल्याचे समजते आहे. भाजपचा विजय होण्यासाठी बिहारमध्ये वापरलेली रणनीती खेळली जाऊ शकते. पक्षाला शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवणे, पक्षाचे काम, प्रचार या गोष्टींवर भर दिला जाऊ शकतो.