
Congress former CM Prithviraj Chavan on marathi person become PM of India political news
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पिंपरी चिंचवडमधील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिले होते. यावेळी भाषणामध्ये अमेरिकेतील राजकीय हालचालींना हवाला देत देशामध्ये राजकीय घडामोड घडणार असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. ते म्हणाले की, अजूनही सर्व काही संपले असे नाही, अजूनही आशा आहे की आपण जिंकू शकतो. जगात बरेच काही सुरु आहे. मध्यंतरी मी एक ट्वीट केले होते ते खूप गाजले. त्यामध्ये लिहिले होते की, मराठी माणूस पंतप्रधान होईल. मराठी माणूस महिन्याभरामध्ये पंतप्रधान होईल. यावर मला अनेकांचे फोन आले, की तुम्ही होणार आहे का? तुमच्या वक्तव्याचा अर्थ काय? हे कसं होईलं असं मला अनेकांनी विचारलं.
हे देखील वाचा : अंतिम आठवडा प्रस्ताव आज; विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्यासह विरोधक विविध प्रश्नांवर आक्रमक
पुढे ते म्हणाले की, “अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे असा दावा चव्हाणांनी केला आहे. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला फारशी कल्पना नाही,” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टच सांगितले
कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती बसण्याची शक्यता निर्माण होत आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. “गेल्या सहा महिन्यांपासून एपस्टाईन फाईल्समुळे अमेरिकेत सुरू असलेल्या गोंधळाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्या कागदपत्रांचे तपशील पूर्णपणे उघड झाल्यास त्याचे परिणाम भारताच्या राजकारणावरही उमटू शकतात. जेफ्री एपस्टाईन या अमेरिकन उद्योगपतीने अनेक गैरकृत्यांमध्ये सहभाग घेतला होता आणि विविध देशांतील काही प्रभावशाली नेत्यांची नावे त्यात समोर आली,” असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.