Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIR अभियानासाठी ‘या’ काँग्रेस नेत्याची राज्य समन्वयकपदी नियुक्ती

निवडणूक आयोगाने राज्यात जाहीर केलेल्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर व्यापक नियोजन सुरू केले आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 15, 2026 | 08:14 PM
SIR अभियानासाठी ‘या’ काँग्रेस नेत्याची राज्य समन्वयकपदी नियुक्ती
Follow Us
Follow Us:
  • SIR अभियानासाठी काँग्रेस सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांची राज्य समन्वयकपदी नियुक्ती
  • SIR भियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर व्यापक नियोजन
  • अभियानांतर्गत प्रत्येक बूथवर BLA नियुक्त करण्यात येणार
निवडणूक आयोगाने राज्यात जाहीर केलेल्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर व्यापक नियोजन सुरू केले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांची राज्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण राज्यात SIR अभियानाचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी अभिजीत सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मतदार यादीचे पुनर्निरीक्षण ही अत्यंत महत्त्वाची आणि लोकशाही प्रक्रियेशी निगडित बाब असल्याने काँग्रेस पक्ष या प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष देणार आहे. अभियानांतर्गत प्रत्येक बूथवर BLA नियुक्त करण्यात येणार असून त्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी तसेच विधानसभा उमेदवारांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभिजित सपकाळ यांनी याआधी प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह इतर राज्यातही काँग्रेसच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यात आला आहे.

“देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं,” मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा भडकले!

SIR प्रक्रिया म्हणजे काय?

ही एक विशेष मोहीम असते ज्यामध्ये मतदार यादीतील चुकीची नावे दुरुस्त केली जातात. मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे काढली जातात. नवीन पात्र मतदारांची नोंदणी केली जाते. तसेच, पत्ता, नाव, वय यामधील चुका सुधारल्या जातात.

SIR का केली जाते?

मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी, बनावट किंवा डुप्लिकेट नावे हटवण्यासाठी तसेच निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी SIR केली जाते.

SIR प्रक्रियेत काय होते?

या प्रक्रियेत घराघरात पडताळणी केली जाते. यासाठी Booth Level Officer (BLO) माहिती गोळा करतो. त्यांच्यामार्फत नागरिकांकडून फॉर्म भरून घेतले जातात. त्यानंतर, मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. तसेच, हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातात. आणि सर्वात शेवटी अंतिम मतदार यादी जाहीर होते. प्रक्रियेत साधारणपणे नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म ६, मतदारयादीतून नाव वगळण्यासाठी फॉर्म ७, माहितीच्या दुरुस्तीसाठी फॉर्म ८ आणि मतदारसंघाच्या पत्त्यात बदल करण्यासाठी फॉर्म ८ ए वापरला जातो.

रुपाली चाकणकरांच्या अशोक खरातसोबतच्या फोटोवरून अंजली दमानिया भडकल्या, SIT कडून चौकशीची मागणी

Web Title: Congress leader abhijit sakpal selected as state coirdinator for sir abhiyan of election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Congress
  • Election Comission

संबंधित बातम्या

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
1

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
2

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
3

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

TET पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर जोरदार आंदोलन
4

TET पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर जोरदार आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.